Lokmat Sakhi >Food > आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष

आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष

आजची बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे अन्नात पोषक तत्वांचा अभाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:26 IST2025-07-18T17:25:48+5:302025-07-18T17:26:16+5:30

आजची बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे अन्नात पोषक तत्वांचा अभाव आहे.

the hidden dangers of your favorite white foods what you need to know | आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष

आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष

आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट असलेले काही पांढरे पदार्थ, जसं की मैदा, साखर आणि मीठ हे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. या पदार्थांचं जास्त सेवन तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतं.

आजची बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे अन्नात पोषक तत्वांचा अभाव आहे. आपण नकळतपणे फास्ट फूड, चायनीज आणि प्रक्रिया केलेलं अन्न भरपूर खात आहोत. हे सर्व अन्नपदार्थ बनवण्यासाठी मीठ, साखर, मैदा, अजिनोमोटो, तांदूळ यासारख्या पांढऱ्या गोष्टींचा सर्वाधिक वापर केला जातो.

'या' आजारांचा वाढतो धोका

विशेष म्हणजे प्रक्रिया केलेल्या अन्नात या सर्व गोष्टींचं प्रमाण खूप धोकादायक पातळीवर आहे. त्यांच्या सेवनामुळे कॅन्सर, टाइप-२ डायबेटिस, लठ्ठपणा, हॉर्ट अटॅक आणि ब्लड प्रेशर यासारखे गंभीर आजार होतात. तसेच व्यक्तीचं आयुष्य किमान १० वर्षांनी कमी होऊ शकतं. 

साखर 

साखरेला एम्प्टी कॅलरीज म्हणतात कारण त्यात कोणतेही पोषक घटक नसतात. शरीरात प्रवेश केल्यावर ते लगेच ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये जातात. जे लोक कमी शारीरिक श्रम करतात त्यांच्या शरीरात ती फॅट्सच्या स्वरूपात जमा होते आणि डायबेटीसचा धोका वाढवते. याशिवाय लिव्हरच्या समस्या, इन्सुलिन रेजिस्टेन्स, डेंटल प्रॉब्लेम आणि कॅन्सरसारख्या आजारांशी देखील संबंधित आहे.

मैदा

मैद्यापासून बनवलेले सर्व पदार्थ जसं की, व्हाईट ब्रेड, केक, बिस्किट आणि पेस्ट्री हे शरीरासाठी घातक आहेत. त्याचा आरोग्याला फटका बसतो. 

तांदूळ 

भारतीय घरांमध्ये तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ला जातो. रिफायनिंग प्रक्रियेत त्यात असलेले फायबर आणि इतर पोषक घटक कमी होतात. अनेक रिसर्चमध्ये, तांदळाचे जास्त सेवन टाइप-२ डायबेटीसच्या वाढीव जोखमीशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे. जर तुम्हाला भात आवडत असेल तर ब्राऊन राईस हा चांगला पर्याय आहेत.

मीठ 

मीठ शरीरासाठी आवश्यक आहे कारण ते सोडियम आणि क्लोराईड पूर्तता करतं. परंतु जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर परिणाम होतो आणि रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. ब्लड प्रेशर वाढतं, हाडं कमकुवत होतात आणि पोटात अल्सर आणि कॅन्सरचा धोका आहे.


 

Web Title: the hidden dangers of your favorite white foods what you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.