Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > सुगंधानेच तोंडाला सुटेल पाणी भाज्यांची राणी झणझणीत शेवभाजी, ढाबा कशाला घरीच करा परफेक्ट शेवभाजी

सुगंधानेच तोंडाला सुटेल पाणी भाज्यांची राणी झणझणीत शेवभाजी, ढाबा कशाला घरीच करा परफेक्ट शेवभाजी

The aroma will make your mouth water. why go to a dhaba? Make the perfect shev bhaji at home : घरीच करा चविष्ट शेव भाजी. झटपट रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2026 08:00 IST2026-02-11T08:00:00+5:302026-02-11T08:00:02+5:30

The aroma will make your mouth water. why go to a dhaba? Make the perfect shev bhaji at home : घरीच करा चविष्ट शेव भाजी. झटपट रेसिपी.

The aroma will make your mouth water. why go to a dhaba? Make the perfect shev bhaji at home. | सुगंधानेच तोंडाला सुटेल पाणी भाज्यांची राणी झणझणीत शेवभाजी, ढाबा कशाला घरीच करा परफेक्ट शेवभाजी

सुगंधानेच तोंडाला सुटेल पाणी भाज्यांची राणी झणझणीत शेवभाजी, ढाबा कशाला घरीच करा परफेक्ट शेवभाजी

काही भाज्यांच्या वासानेही भूक लागते अशीच एक झणझणीत भाजी म्हणजे शेव भाजी. त्याचा रस्सा, त्यातील तिखट शेव फोडणी आणि वाटणाची चव म्हणजे आहाहा!! हा पदार्थ हॉटेल आणि ढाब्यावर फार मागणीत असतो. लोकं आवडीने खतात. (The aroma will make your mouth water. why go to a dhaba? Make the perfect shev bhaji at home.)मुळात घरीच चमचमीत शेव भाजी करणे फार सोपे आहे. त्यासाठी ढाब्यावर जायची गरज नाही. रेसिपी अगदी बेसिक आणि सोपीही आहे.   

साहित्य 
कांदा, लसूण, सुकं खोबरं, पाणी, तेल, जिरं, हिंग, सुकी लाल मिरची, टोमॅटो, धणे - जिरे पूड, लाल तिखट, लाल तिखट शेव, कोथिंबीर 

कृती
१. गॅसवर जाळी ठेवायची आणि त्यावर कांदा ठेवायचा. कांदा सोलून घ्यायचा आणि त्याचे दोन तुकडे करायचे. तसेच खोबरं घ्यायचं आणि त्याचेही मोठे तुकडे करायचे. कांदा आणि खोबरं मस्त भाजून घ्यायचे. जरा जळले तरी चालेल. स्मोकी चव फार मस्त येते. त्यात लसणाच्या पाकळ्याही घालायच्या. लसुणही मस्त भाजून घ्यायचा. त्याचे वाटण तयार करायचे. अगदी थोडे पाणी वापरुन करायचे. पातळ नको. 

२. कांदा बारीक चिरायचा. सुक्या मिरचीचे तुकडे करायचे. एका कढईत तेल घ्यायचे. तेल छान गरम झाल्यावर त्यात थोडे जिरे घालायचे. जिरे मस्त तडतडल्यावर त्यात लाल सुकी मिरची घालायची. तुकडे करुन घालायची. मस्त परतून घ्यायचे. कांदा छान खमंग परतला की त्यात हिंग घालायचे.  मसाला छान परतल्यावर त्यात हळद आणि लाल तिखट घालायचे. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. 

३. मस्त फोडणी तयार झाल्यावर तयार केलेले वाटण त्यात घालायचे. छान ढवळून घ्यायचे. त्यात थोडे मीठ घालायचे. मस्त परतून घ्यायचे. वाटण लाल दिसायला लागले की त्यात थोडे पाणी घालायचे. जास्त पातळ नाही मात्र मध्यम अशी ग्रेव्ही तयार करायची. त्याला छान उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. रस्सा छान तयार झाल्यावर त्यात शेव घालायची. गरमागरम भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत खा.   

Web Title : मसालेदार शेव भाजी रेसिपी: घर पर आसानी से बनाएं रेस्टोरेंट जैसा व्यंजन

Web Summary : मसालेदार शेव भाजी खाने का मन है? रेस्टोरेंट को छोड़ दीजिये! इस आसान रेसिपी में प्याज, टमाटर और विशेष मसालों जैसी सरल सामग्री का उपयोग किया गया है। धुएँ के स्वाद के लिए सामग्री को भूनें और एक स्वादिष्ट ग्रेवी तैयार करें और शेव डालें। रोटी या चावल के साथ आनंद लें।

Web Title : Spicy Shev Bhaji Recipe: Make Restaurant-Style Dish Easily at Home

Web Summary : Craving spicy Shev Bhaji? Skip the restaurant! This easy recipe uses simple ingredients like onion, tomato, and special spices. Roast the ingredients for smoky flavor and prepare a delicious gravy and add shev. Enjoy with roti or rice.