लोणचं, चटणी हे पदार्थ भारतात घरोघरी आवडीने खाल्ले जातात. विकतही मिळतात मात्र घरी केलेल्या लोणच्याची मजाच काही और असते. कैरी, मिरची, भाज्या, मिरची विविध प्रकारची लोणची करता येतात. मसालाही घरीच करायचा, म्हणजे चव जास्त छान लागते. (The aroma will make your mouth water, check out this quick recipe for garlic pickle, it will enhance the flavor of your food)लसूण खायला आवडत असेल तर हे लोणचे खास तुमच्यासाठीच आहे. लसूण लोणचे करायची अगदी सोपी रेसिपी पाहा. तासाभरात करा दोन महिने टिकते. पाहा कसे करायचे.
साहित्य
मेथी दाणे, बडीशेप, जिरे, कांद्याच्या बिया, तेल, लसूण, हळद, लाल तिखट, धणे - जिरे पूड, मीठ
कृती
१. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. भरपूर लसूण घ्यायचा. लसूण धुवायचा आणि वाळवून घ्यायचा. एका पॅनमध्ये थोडे मेथीचे दाणे घ्यायचे. छान भाजायचे. नंतर त्याच पॅनमध्ये थोडी बडीशेप घ्यायची. मस्त भजायची. कुरकुरीत होते. नंतर थोडे जिरे भाजून घ्यायचे. कांद्याच्या बियाही भाजून घ्यायच्या. सगळे पदार्थ गार करायचे. कांद्याच्या बिया वेगळ्या वाटायच्या. इतर पदार्थ एकत्र करुन वाटून घ्यायचे.
२. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. त्यात लसूण परतून घ्यायचा. छान खमंग परतायचे. लालसर परतायचे. लसणाच्या पाकळ्या परतण्यासाठी तेलही जरा जास्त घ्यायचे. लसूण गार होऊ द्यायचा. एका खोलगट भांड्यात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्यात तयार केलेला मसाला घालायचा. तसेच वाटलेल्या कांद्याच्या बिया घालायच्या. चमचाभर हळद घालायची.चमचाभर धणे - जिरे पूड घालायची. तसेच चमचाभर हळद घालायची. लसूण आणि मसाले मिक्स करायचे. तेल गरम करायचे आणि गरमागरम तेल ओतायचे, लोणचे कालवून घ्यायचे.
३. गार झाल्यावर एका हवाबंद डब्यात काढून घ्यायचे. साठवून ठेवायचे, दोन महिने वगैरे टिकते. फक्त व्यवस्थित ठेवायचे. भात आणि चपाती दोन्हीसोबत अगदी मस्त लागते. नक्की करुन पाहा.
