Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > नक्को पोळीभाजी म्हणणारे मुलंही खातील ३-३ पोळ्या, मुलांसाठी ‘असा’ करा पोळीचा स्प्रिंग रोल

नक्को पोळीभाजी म्हणणारे मुलंही खातील ३-३ पोळ्या, मुलांसाठी ‘असा’ करा पोळीचा स्प्रिंग रोल

Tasty Crunchy Spring Roll From Leftover Chapati: पोळी भाजी खाण्याचा कधी कंटाळा आला किंवा मग पोळ्या खूप उरल्या तर त्यांच्यापासून असे चटकदार स्प्रिंग रोल करून पाहा...(how to make spring roll from wheat roti?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2026 16:14 IST2026-02-10T16:13:13+5:302026-02-10T16:14:12+5:30

Tasty Crunchy Spring Roll From Leftover Chapati: पोळी भाजी खाण्याचा कधी कंटाळा आला किंवा मग पोळ्या खूप उरल्या तर त्यांच्यापासून असे चटकदार स्प्रिंग रोल करून पाहा...(how to make spring roll from wheat roti?)

tasty crunchy spring roll from leftover chapati, how to make spring roll from wheat roti, spring roll recipe  | नक्को पोळीभाजी म्हणणारे मुलंही खातील ३-३ पोळ्या, मुलांसाठी ‘असा’ करा पोळीचा स्प्रिंग रोल

नक्को पोळीभाजी म्हणणारे मुलंही खातील ३-३ पोळ्या, मुलांसाठी ‘असा’ करा पोळीचा स्प्रिंग रोल

बऱ्याचदा असं होतं की तेच ते पोळी भाज्या खाण्याचा खूप कंटाळा येतो. मुलांना तर सतत काहीतरी वेगळं आणि चवदार हवं असतं. अशावेळी काय करावं असा प्रश्न पडला असेल तर सरळ भरपूर भाज्या घालून पोळ्यांचे स्प्रिंग रोल करून द्या. आपल्या नेहमीच्या पोळ्या किंवा चपात्या आणि त्यामध्ये घातलेल्या भरपूर भाज्या अशा स्वरुपाचा हा पदार्थ असल्याने तो पौष्टिकही आहे (Tasty Crunchy Spring Roll From Leftover Chapati). त्यामुळे कधी संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून किंवा रात्रीच्या वेळी थोडंसं काहीतरी खायचं असेल तर किंवा मग मुलांच्या डब्यात द्यायलाही क्रिस्पी स्प्रिंग रोल हा एक अतिशय चवदार पर्याय आहे.(how to make spring roll from wheat roti?)

 

स्प्रिंग रोल करण्याची रेसिपी

स्प्रिंग रोल करण्यासाठी आपल्याला पोळ्या लागणार आहेत. त्यासोबतच कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर, मटार अशा तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या घ्या. भाज्या बारीक चिरून घ्या आणि नंतर मग कढईमध्ये तेल घालून हलक्या फ्राय करू शकता.

उन्हात फिरल्याने चेहरा खूप काळवंडून गेला? टोमॅटोच्या पल्पचा सोपा उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग गायब

या भाज्यांच्या स्टफिंगला आणखी चव आणण्यासाठी त्यात वेगवेगळे सॉस आणि मसालेही घाला. त्यामुळे स्प्रिंग रोल आणखी चटपटीत होतील. 

 

आता पोळीला एका बाजुने टोमॅटो सॉस लावा. त्यावर परतून घेतलेल्या भाज्या मधोमध ठेवा. यानंतर त्याचा रोल करा. आता या रोलच्या दोन्ही बाजू बंद करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर वापरा.

शुगर- कोलेस्टेरॉल नेहमीच वाढलेलं असतं? जेवणाच्या आधी 'हे' पदार्थ खा- रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

त्यासाठी कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून ते कालवून घ्या. ते रोलच्या दोन्ही बाजूंना लावून बोटाने दाबून घ्या. रोलमध्ये घातलेलं भाज्यांचं स्टफिंग बाहेर येणार नाही. यानंतर कढईमध्ये तेल घाला आणि रोल तळून घ्या. मस्त चटकदार कुरकुरीत स्प्रिंग रोल तयार. एकदा नक्की खाऊन पाहा.. 
 

Web Title: tasty crunchy spring roll from leftover chapati, how to make spring roll from wheat roti, spring roll recipe