Lokmat Sakhi >Food > श्रावण स्पेशल : अळूवडी करण्याची नवी पद्धत! करा भरपूर, लेअर्स असणारी खमंग, कुरकुरीत वडी - करताच होईल फस्त...

श्रावण स्पेशल : अळूवडी करण्याची नवी पद्धत! करा भरपूर, लेअर्स असणारी खमंग, कुरकुरीत वडी - करताच होईल फस्त...

How To Make Aluvadi At Home : How to make Alu Vadi with twist : New Style Alu Vadi Recipe : Tasty Alu Vadi with unique method : Maharashtrian Alu Vadi with a twist : नेहमीच्या पारंपरिक अळुवडीला थोडा मॉडर्न ट्विस्ट देत चौकोनी आकाराची, भरपूर लेअर्स असणारी कुरकुरीत अळूवडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2025 19:09 IST2025-08-02T14:03:23+5:302025-08-02T19:09:45+5:30

How To Make Aluvadi At Home : How to make Alu Vadi with twist : New Style Alu Vadi Recipe : Tasty Alu Vadi with unique method : Maharashtrian Alu Vadi with a twist : नेहमीच्या पारंपरिक अळुवडीला थोडा मॉडर्न ट्विस्ट देत चौकोनी आकाराची, भरपूर लेअर्स असणारी कुरकुरीत अळूवडी...

Tasty Alu Vadi with unique method Maharashtrian Alu Vadi with a twist How To Make Aluvadi At Home New Style Alu Vadi Recipe | श्रावण स्पेशल : अळूवडी करण्याची नवी पद्धत! करा भरपूर, लेअर्स असणारी खमंग, कुरकुरीत वडी - करताच होईल फस्त...

श्रावण स्पेशल : अळूवडी करण्याची नवी पद्धत! करा भरपूर, लेअर्स असणारी खमंग, कुरकुरीत वडी - करताच होईल फस्त...

श्रावण महिना आणि पावसाळ्याच्या सिझनला चांगलीच सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या सणावाराच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रान भाज्यांचा आहारात समावेश करतोच. 'अळू' ही त्यापैकीच एक (How to make Alu Vadi with twist) सगळ्यांच्याच अतिशय आवडीची भाजी. अळूच्या भाजीपेक्षा अळूची कुरकुरीत (How To Make Aluvadi At Home) वडीच आपल्याकडे मोठ्या आवडीने खाल्ली जाते, तितक्याच (Tasty Alu Vadi with unique method) हौसेने ती घरोघर तयार देखील केली जाते. 'अळूची वडी' हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ आहे. अळूची पाने, मसाले आणि बेसन यांच्या परफेक्ट मिश्रणातून तयार होणारी ही वडी चविष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर असते(Maharashtrian Alu Vadi with a twist).

श्रावणातील सण-उत्सव किंवा खास जेवणात अळूची वडी ही नेहमीच विशेष मानली जाते. कुरकुरीत तळलेली किंवा वाफवून साजूक तुपात परतलेली वडी प्रत्येक घासात अस्सल पारंपरिक चवीचा अनुभव देते. अळूची वडी म्हटलं की आपल्याला नेहमीची ती पारंपरिक पद्धतीने केली जाणारी गोलाकार अळुवडीचं आठवते. पण या नेहमीच्या पारंपरिक अळुवडीला थोडा मॉडर्न ट्विस्ट देत आपण चौकोनी आकाराची व भरपूर लेअर्स असणारी कुरकुरीत अळूवडी झटपट घरच्याघरीच करु शकतो. यंदा श्रावणात अळुवडीचा बेत करणार असाल तर नेहमीची पारंपरिक पद्धत न वापरता झटपट करता येईल अशा सोप्या आणि नव्या पद्धतीने अळूवडी नक्की करुन पाहा. भरपूर लेअर्स असणारी, खमंग, खरपूस अशी अळूवडी कशी तयार करायची याची रेसिपी पाहा.  

साहित्य :- 

१. अळूची पाने - ६ ते ७ पाने 
२. बेसन - १/४ कप 
३. आलं - १ टेबलस्पून (बारीक चिरलेलं)
४. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरलेल्या)
५. लसूण पाकळ्या - ५ ते ८ 
६. जिरे - १ टेबलस्पून 
७. हळद पावडर - १ टेबलस्पून 
८. ओवा - १/२ टेबलस्पून 
९. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
१०. धणेपूड - १/२ टेबलस्पून 
११. आमचूर पावडर -  १/२ टेबलस्पून 
१२. लिंबाचा रस - २ ते ३ टेबलस्पून
१३. हिंग - १/४ टेबलस्पून 
१४. मीठ - चवीनुसार 
१५. तेल - तळण्यासाठी 
१६. मोहरी - १ टेबलस्पून 
१७. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 

Alu Vadi : अळूवडी करताना टाळा ‘या’ चुका, मग अळूवडी कायमच होईल परफेक्ट कुरकुरीत...


Shravan Food : राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी करा घरीच, उपवास स्पेशल पौष्टिक खाऊ - महिनाभर टिकेल...

कृती :- 

१. सगळ्यात आधी अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून त्याच्या शिरा कापून हलकेच त्यावर लाटण फिरवून घ्यावे. मग एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात लसूण - आलं - हिरव्या मिरच्या - जिरे यांची एकत्रित वाटून घेतलेली पेस्ट घालावी. मग त्यात हळद, लाल मिरची पवडर, धणेपूड, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, लिंबाचा रस आणि गरजेनुसार पाणी घालून हे बेसन बॅटर चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. 
२. एक सपाट,पसरट पृष्ठभाग असणारं भांड किंवा केक टिन घेऊन त्यात अळूचं पान व्यवस्थित पसरवून ठेवावे मग त्या पानावर तयार बेसनचे बॅटर व्यवस्थित पसरवून लावावे. मग त्यावर दुसरे पान ठेवून पुन्हा बेसन बॅटर लावून घ्यावे. असे एकावर एक अळूचे पान आणि बेसन बॅटर लावून अळूवडीचे लेअर्स तयार करून घ्यावे. मग सगळ्यात शेवटच्या पानाला बेसन बॅटर लावून त्यावर थोडे पांढरे तीळ भुरभुरवून घ्यावेत. 

३. एका मोठ्या कढईत पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. मग या कढईत एक स्टँण्ड ठेवून त्यावर अळूवडीचे भांडं ठेवून वरून झाकण ठेवावे. वाफेवर अळूवडी १५ ते २० मिनिटे व्यवस्थित शिजू द्यावी. २० मिनिटानंतर अळूवडी व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करून डब्यांतून अळूवडीचे मिश्रण बाहेर काढून सुरीच्या मदतीने त्याच्या चौकोनी आकारात वड्या पाडून घ्याव्यात. वड्या पाडल्यानंतर आपण पाहू शकता की, या अळूवडीला छान असे लेअर्स आलेले दिसतील. 
४. मग एका भांड्यात थोडे तेल घेऊन त्यात मोहरी आणि जिरे घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ही फोडणी तयार वडीच्या तुकड्यांवर ओतावी. मग एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन वड्या शॅलो फ्राय करुन घ्याव्यात. आपल्या आवडीनुसार आपण वड्या तेलात डीप फ्राय देखील करु शकता. 

भरपूर लेअर्सची कुरकुरीत अशी चटपटीत, खमंग चवीची मॉडर्न स्टाईल अळूवडी खण्यासाठी तयार आहे. नेहमीची ती पारंपरिक अळूवडी आपण करतोच पण यंदा अशा प्रकारची अळूवडी नक्की ट्राय करुन पाहा.

Web Title: Tasty Alu Vadi with unique method Maharashtrian Alu Vadi with a twist How To Make Aluvadi At Home New Style Alu Vadi Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.