मिसळ पाव म्हटलं की त्यात फक्त मिसळ आणि पाव एवढंच नसतं. सोबत कच्चा कांदा हवा, लिंबू हवा तसंच वरतून कोथिंबीरही हवीच. त्यासोबत आणखी फार महत्वाची एक गोष्ट हवी ती म्हणजे तर्री. तर्रीला अनेक जण कट म्हणतात. तसेच काही जण रस्सा म्हणतात. विविध नावं असली तरी चव फारच मस्त असते. (Tarri recipe - easy way of making rassa for misal, must try this method )एकदा नक्की करुन पाहा, फार मस्त लागते. भाजी असो किंवा भात चव वाढवण्यासाठी हा रस्सा नक्कीच करता येईल. पाहा सोपी रेसिपी. विकतपेक्षा मस्त तर्री घरी करा.
साहित्य कांदा, लसूण, सुकं खोबरं , तेल, लाल तिखट, आले, लिंबू, पाणी
कृती१. गॅसवर कांदा भाजून घ्यायचा. कांद्याचे दोन तुकडे करायचे आणि तो खरपूस भाजायचा. तसेच सुक्या खोबऱ्याचे तुकडेही भाजून घ्यायचे. जरा जाळले तरी चालेल. नंतर कांदा सोलून घ्या आणि खोबऱ्याचे तुकडे करा. लसणाच्या काही पाकळ्या सोला आणि त्याही भाजून घ्यायच्या.
२. एका मिक्सरच्या भांड्यात कांदा घ्यायचा तसेच सुकं खोबरं घ्यायचं. थोडं आलं घ्या आणि लसूणही घ्यायचा. त्याची पेस्ट तयार करुन घ्यायची. जाडसरच वाटा फक्त फारच जास्त वाटली जाणार नाही याची काळजी घ्या.
३. एका कढईत थोडं तेल घ्यायचं. तेल जरा गरम झालं की त्यात तयार केलेले वाटण घालायचे आणि मस्त खमंग परतायचे. त्याचा रंग जरा बदलायला लागला की त्यात लाल तिखट घालायचे. खमंग परतून झाल्यावर त्यात पाणी ओतायचे. मस्त लाल तवंग येतो. चवीनुसार मीठ घालून मग त्यात लिंबू पिळायचे. लिंबाचा रस चव जास्त खुलवतो आणि तिखटामुळे घशाला त्रास नाही होणार याची काळजी घेतो.
४. पाण्याचे प्रमाण आवडीनुसार ठरवा. मस्त एकजीव होईपर्यंत उकळा. मिसळ , उसळ, तर्री पोहे, कट वडा आदी सगळ्या पदार्थांसोबत हा कट एकदम मस्त लागतो. करायलाही अगदीच सोपा आहे. त्यामुळे एकदा नक्कीच करुन पाहा. तसेच भाजी जर मिळमिळीत लागत असेल तरी त्यासोबत हा रस्सा घेता येतो. नक्की करुन पाहा.
Web Summary : This simple recipe teaches you how to make flavorful tarri (spicy gravy) for misal. Roast ingredients, grind into paste, sauté, add spices, water, and lemon. Enjoy with misal, usal, or even rice!
Web Summary : यह आसान रेसिपी आपको मिसल के लिए स्वादिष्ट तरी (मसालेदार ग्रेवी) बनाना सिखाती है। सामग्री को भूनें, पेस्ट में पीस लें, भूनें, मसाले, पानी और नींबू डालें। मिसल, उसल या चावल के साथ आनंद लें!