Lokmat Sakhi >Food > धो - धो कोसळणाऱ्या पावसात घ्या तंदुरी कॉर्न खाण्याचा आनंद! पावसाळ्यातील चटपटीत - मसालेदार पदार्थ...

धो - धो कोसळणाऱ्या पावसात घ्या तंदुरी कॉर्न खाण्याचा आनंद! पावसाळ्यातील चटपटीत - मसालेदार पदार्थ...

Tandoori Corn : How To Make Tandoori Corn At Home : How to make Monsoon Special Tandoori Corn : Tandoori Corn Recipe : पावसाळ्यात नेहमीप्रमाणेच मक्याचे कणीस भाजून खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून तंदुरी कॉर्नची रेसिपी नक्की ट्राय करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 14:52 IST2025-06-06T14:42:12+5:302025-06-06T14:52:56+5:30

Tandoori Corn : How To Make Tandoori Corn At Home : How to make Monsoon Special Tandoori Corn : Tandoori Corn Recipe : पावसाळ्यात नेहमीप्रमाणेच मक्याचे कणीस भाजून खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून तंदुरी कॉर्नची रेसिपी नक्की ट्राय करा...

Tandoori Corn How To Make Tandoori Corn At Home How to make Monsoon Special Tandoori Corn Tandoori Corn Recipe | धो - धो कोसळणाऱ्या पावसात घ्या तंदुरी कॉर्न खाण्याचा आनंद! पावसाळ्यातील चटपटीत - मसालेदार पदार्थ...

धो - धो कोसळणाऱ्या पावसात घ्या तंदुरी कॉर्न खाण्याचा आनंद! पावसाळ्यातील चटपटीत - मसालेदार पदार्थ...

पावसाळा आणि मक्याचे कणीस यांचं अनोखं नातं आहे. आपल्याकडील पावसाळा हा मक्याच्या कणसाशिवाय अधूराच म्हणावा लागेल. पावसाळ्याच्या दिवसांत मक्याचे दाणे (Tandoori Corn) खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तिखट - मीठ आणि लिंबाचा रस पिळलेला मका खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. धो धो कोसळणाऱ्या पावसात गरमागरम मीठ - मसाला लावलेले मक्याचे कणीस खाणे म्हणजे सुख. मुसळदार पडणाऱ्या (Tandoori Corn Recipe) पावसात जर हातात गरमागरम मक्याचे कणीस (How To Make Tandoori Corn At Home)असेल, त्यावर लिंबू, मीठ आणि थोडं तिखट चुरून घातलेलं असेल... तर तो क्षण म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच असते( How to make Monsoon Special Tandoori Corn).

भाजलेलं मक्याचं कणीस आणि उकडलेला मका हे दोन्ही आपण आवडीने खातो. अनेकवेळा आपण नाश्त्यात मक्यापासून तयार केलेले विविध पदार्थ खातो. आपल्याकडे कॉर्न पॅटिस, कॉर्न भेळ, कॉर्न पुलाव, कॉर्न सूप असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यंदाच्या पावसाळ्यात नेहमीप्रमाणेच मक्याचे कणीस भाजून खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून तंदुरी कॉर्न नक्की ट्राय करून पाहा.  

साहित्य :- 

१. दही - २ ते ३ टेबलस्पून
२. तेल - ३ ते ४ टेबलस्पून 
३. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून 
४. हळद - १/२ टेबलस्पून 
५. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
६. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
७. धणेपूड - १/२ टेबलस्पून 
८. मीठ - चवीनुसार
९. कसुरी मेथी - १/२ टेबलस्पून 
१०. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
११. लिंबाचा रस - २ टेबलस्पून 
१२. चाट मसाला - चवीनुसार 
१३. पाणी - गरजेनुसार

कौतुकानं लोणचं घातलं पण महिनाभरात त्यात अळ्या-बुरशी? आजीच्या ३ पारंपरिक टिप्स-लोणचं टिकेल वर्षभर...


शिळ्या भाताचा करा मस्त मऊ हलका ढोकळा, फोडणीच्या भातापेक्षा भारी आणि होतो झटपट...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊ ते व्यवस्थित उकळवून घ्यावे. या उकळत्या पाण्यात मक्याचे कणीस सोलून मका उकडवून घेण्यासाठी ठेवून दयावा. गरम उकळत्या पाण्यात मका व्यवस्थित उकडवून घ्यावा. 
२. आता एका मोठ्या बाऊलमध्ये, घट्ट दही घेऊन त्यात तेल, आलं - लसूण पेस्ट,हळद, लाल मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, धणेपूड, चवीनुसार मीठ घालावे. 

फक्त १५ मिनिटांत करा आप्पेपात्रात मिनी मँगो केक, शाळेच्या डब्यासाठी खास रेसिपी- शाळेची सुरुवात आनंदात...

३. सगळ्यात शेवटी या मिश्रणात कसुरी मेथी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आता येऊ सगळे जिन्नस एकत्रित चमच्याने कालवून त्याची क्रिमी अशी पेस्ट तयार करून घ्यावी. 
४. ही तयार पेस्ट उकडवून घेतलेल्या मक्याच्या कणसावर व्यवस्थित पसरवून लावून घ्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे गॅसच्या मंद आचेवर हे कणीस ठेवून भाजून घ्यावे. 
५. कणीस छान खरपूर भाजून झाल्यावर त्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरवून घ्यावा, लिंबाचा रस देखील लावावा. 

धो - धो कोसळणाऱ्या पावसात गरमागरम तंदुरी कणीस खाण्याचा आनंद यंदाच्या पावसाळ्यात नक्की घ्याच.

Web Title: Tandoori Corn How To Make Tandoori Corn At Home How to make Monsoon Special Tandoori Corn Tandoori Corn Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.