फोडणीचं ताक हे आपल्या पारंपरिक मराठी आहारातील अतिशय साधं पण तितकंच स्वादिष्ट पेय मानलं जातं. साध्या ताकाला दिलेली फोडणी साधीच मात्र त्यामुळे चव अनेक पटींनी वाढवते आणि रोजच्या जेवणात एक खास पदार्थ म्हणून फोडणीचे ताक नक्की करा. (takda buttermilk is a special traditional recipe - drink a glass after meals, perfect summer recipe)विशेषतः उन्हाळ्यात हे ताक शरीराला थंडावा देतं, पचन सुधारतं आणि थकवा कमी करण्यास मदत करतं.
गावाकडच्या घरांमध्ये दही घुसळून तयार केलेलं ताक आणि त्यावर दिलेली जिरं, मोहरी, कडीपत्ता, लसूण किंवा मिरचीची फोडणी हा एक पारंपरिक स्वाद असतो. या फोडणीमुळे ताकाला एक वेगळाच सुगंध आणि चटकदार चव मिळते. साधं ताक पिण्यापेक्षा फोडणीचं ताक अधिक रुचकर वाटतं, म्हणूनच अनेक घरांमध्ये ते आवडीने केलं जातं. त्यातील प्रोबायोटिक्स पचनसंस्था मजबूत ठेवतात, तर जिऱ्या यांसारख्या घटकांमुळे गॅस, अपचन यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. हलकं आणि सहज पचणारं असल्यामुळे जेवणानंतर एक ग्लास फोडणीचं ताक घेतलं तर जेवण पूर्ण झाल्याची छान भावना मिळते.
कृती १. मस्त ताज ताक तयार करुन घ्यायचं. जरा घट्टसर ताक घ्यायचं. ताक आंबट नको. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. ताजी कोथिंबीर घ्यायची, स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या.
२. एका फोडणीपात्रात चमचाभर तूप घ्यायचे. तुपात थोडे जिरे घालायचे. तसेच लसणाच्या सोललेल्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि फोडणीत टाकायच्या. लसणाचा रंग बदलायला लागल्यावर त्यात थोडं हिंग घालायचं. हिंग घातल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. छान परतून घ्यायचे. मिरची जरा कुरकुरीत झाली की गॅस बंद करा आणि फोडणी गार होऊ द्या.
३. नंतर तयार फोडणी ताकात ओतायची, त्यात चवीनुसार मीठ घालायचे. ढवळून घ्यायचे. त्यात बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची. तुम्हाला जेवढी आवडते त्यानुसार प्रमाण ठरवा.
Web Summary : Fodni che Taak, a spiced buttermilk, is a simple yet flavorful traditional Marathi drink. It aids digestion, cools the body, and reduces fatigue, especially in summer. Seasoned with spices, it's a refreshing post-meal beverage.
Web Summary : फोडनी चे ताक, एक मसालेदार छाछ, एक सरल फिर भी स्वादिष्ट पारंपरिक मराठी पेय है। यह पाचन में मदद करता है, शरीर को ठंडा करता है, और थकान को कम करता है, खासकर गर्मियों में। मसालों के साथ अनुभवी, यह भोजन के बाद एक ताज़ा पेय है।