महाराष्ट्रातील पारंपारीक पदार्थांमध्ये पिठलं भाकरी हा पदार्थ असतोच. जेव्हा घरात भाजी नसेत किंवा त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तेव्हा काहीतरी झटपट आणि चवदार खाण्याची इच्छा होते. तेव्ही तुम्ही झटपट करू शकता असा हा पदार्थ आहे (How To Make Tadka Pithala). तकडा पिठलं हे साध्या पिठल्यापेक्षा जास्त चवदार लागते. साध्या पिठल्याला जिरं-मोहोरी आणि लसणाचा खमंग तडका दिला की त्याची चव दुप्पटीनं वाढते. (Tadka Pithal Recipe)
तडका पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य
बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ १ वाटी लागेल, २ मध्यम बारीक चिरलेले कांदे, १० ते १२ लसूण पाकळ्या ठेचून किंवा चिरून घ्या. ३ ते ४ हिरव्या मिरच्या, पाणी २ ते ३ वाट्या आणि तेल ३ मोठे चमचे. मोहोरी, जीरं, हिंग, हळद हे पदार्थ फोडणीसाठी लागतील. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
तडका पिठलं करण्याची सोपी कृती
सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये बेसन घेऊन त्यात थोडं पाणी घाला. बेसनात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. मध्यम सरसरीत मिश्रण करून घ्या.
रोज २ वेळा धुवूनही चेहरा काळपट दिसतो? हे घ्या सोपं स्किन केअर रुटीन-चेहऱ्यावर येईल तेज
कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं आणि हिंगाची खमंग फोडणी द्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत परतवून घ्या.
कांदा परतला की त्यात हळद घाला आणि तयार केलेलं बेसनाचं मिश्रण घाला. चवीनुसार मीठ घालून सतत ढवळत राहा जेणेकरून पिठलं खाली लागणार नाही. मिश्रणाला घट्टपणा येऊ लागला की गॅसची फ्लेम कमी करा आणि झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटं वाफवून घ्या.
कॉटनच्या साड्यांचे ७ प्रकार; उन्हाळ्यात नेसा कॉटनच्या हलक्या-फुलक्या, सुंदर साड्या
एका लहानश्या तडका देण्याच्या भांड्यात तेल गरम करा. त्यात भरपूर ठेचलेला लसूण आणि थोडं लाल तिखट घालून तडतडलेली फोडणी पिठल्यावर ओता. यावर भरपूर ताजी चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम तडका पिठलं सर्व्ह करा. भातासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही हे तडका पिठलं खाऊ शकता. हे पिठलं खाल्ल्यानं तोंडाला चव येईल.
Web Summary : Craving a quick, tasty dish? Try Tadka Pithla! This Maharashtrian favorite uses besan, onions, garlic, and green chilies. A zesty tadka of cumin, mustard seeds, and garlic elevates the flavor. Enjoy it with bhakri or rice for a satisfying meal.
Web Summary : जल्दी और स्वादिष्ट व्यंजन की तलाश है? तड़का पिठला आजमाएं! यह महाराष्ट्रीयन व्यंजन बेसन, प्याज, लहसुन और हरी मिर्च का उपयोग करके बनाया जाता है। जीरा, सरसों के बीज और लहसुन का एक स्वादिष्ट तड़का स्वाद को बढ़ाता है। इसे भाकरी या चावल के साथ आनंद लें।