शेवयांची खीर हा पदार्थ घरोघरी केला जातो. एकदम मस्त चविष्ट आणि लगेच होणारा गोडाचा पदार्थ म्हणजे खीर. (sweet vermicelli recipe, Make a delicious dish in just ten minutes , mithai recipes, Indian sweets)फक्त गोडच नाही तर या शेवयांचा तिखट शीरा किंवा तिखट उपमाही केला जातो. कांदा, कोथिंबीर घालून केलेला हा उपमा मस्त लागतो. तसेच नुसत्या शेवया परतून मीठ मसाला लावूनही खाल्ला जातो. शेवया घरोघरी असतात. त्याचे फार पदार्थ केले जात नाहीत. गोडाचे पदार्थ करायचे म्हणजे फार कष्ट करावे लागतात. त्यामुळे लोकं मिठाई विकत आणतात. मात्र काही पदार्थ झटपट करता येतात त्यापैकीच एक म्हणजे शेवया.
फक्त खीरच नाही तर दूध न वापरताही शेवयांचा मस्त मऊ गोड पदार्थ करता येतो. एकदा अशा गोड शेवया करुन पाहा. नक्की आवडतील. करायला अगदी सोप्या असतात. लहान मुलांच्या डब्यासाठीही हा पदार्थ अगदी मस्त आहे. करायला अगदी दहा ते पंधरा मिनिटे लागतात.
साहित्यतूप, शेवया, साखर, पाणी, वेलची पूड, सुकामेवा
कृती१. एका कढईत थोडे तूप घ्यायचे. त्यावर सुकामेवा परतायचा. काजू घ्यायचे. तसेच बदाम घ्यायचे. बेदाणे तर अगदी मस्त लागतात. तसेच पिस्ता असेल तर तो वापरा. आवडीनुसार सुकामेवा घ्यायचा. फक्त काजू बदाम आवर्जून घ्यायचे. परतण्याआधी सुकामेवा जरा ठेचून बारीक करायचा. अगदी भुगा करु नका फक्त तुकडे करुन घ्यायचे.
२. सुकामेवा परतून झाल्यावर काढून घ्यायचा आणि अजून चमचाभर तूप घ्यायचे. त्यात शेवया परतायच्या. शेवया परतण्याआधी जरा हाताने तोडायच्या. जरा बारीक करायच्या. शेवया खमंग परतायच्या. जरा दहा मिनिटे मंद आचेवर परतायच्या. नंतर त्यात चवी पुरती साखर घालायची. तुम्हाला गोड जितपत आवडते त्यानुसार साखरेचे प्रमाण ठरवा. साखर आणि शेवया छान ढवळा. साखर जरा विरघळायला लागली की त्यात थोडे पाणी घालायचे. अर्धी वाटी पाणी घाला. शेवया ओल्या होण्यापुरतेच पाणी घालायचे.
३. शेवया छान शिजल्यावर आणि त्यातील पाण्या आटल्यावर त्यातील साखर विरघळली आहे का हे पाहून घ्यायचे. त्यात चमचाभर वेलची पूड घालायची. साखर विरघळल्यावर त्यात परतलेला सुकामेवा घालायचा. सगळं एकदा ढवळायचं. एक वाफ काढायची आणि गरमागरम शेवया खायच्या.