Join us

गोड अप्पे रेसिपी : दहा मिनिटात करा केळीचे खमंग अप्पे, खमंग, मऊ आणि खुसखुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 17:00 IST

Sweet Appe Recipe: Make Banana Appe in ten minutes, delicious soft and crispy recipe : गोड अप्पे एकदा नक्की करा. चवीला मस्त आणि करायला एकदम सोपे. केळीचे असे चविष्ट अप्पे मुलांनाही आवडतील.

अप्पे खायला आवडते का? मग तिखट अप्पे तर नेहमी खात असालच. एकदा हे केळीचे गोड अप्पेही खाऊन पाहा. याला रवा पानीयारम असे नाव आहे. (Sweet Appe Recipe: Make Banana Appe in ten minutes, delicious soft and crispy recipe )पटकन होणारा हा पदार्थ मस्त खमंग आणि मऊ होतो. आतून मऊ बाहेरुन कुरकुरीत असे केळीचे अप्पे नक्की करुन पाहा. 

साहित्य केळ, गूळ, रवा, मैदा, तूप, बेकींग सोडा, पाणी, वेलची पूड, काजू, बदाम  

कृती१. एक केळं घ्या. केळं व्यवस्थित पिकलेलं असेल असंच घ्यायचं. थोडंही कच्च नको. केळं कुसरुन घ्यायचं. त्यात वाटीभर रवा घालायचा. तसेच त्यात वाटीभर मैदा घालायचा. गूळाची पूड बाजारत मिळते. ती जर मिळाली तर ती पूड वापरा. नाही मिळाली तर गूळ छान किसून घ्यायचा. ओला गूळ न घेता जरा सुका गूळच घ्यायचा. काजू आणि बदाम जरा कुटायचे. एकदम बारीक करु नका. जरा तुकडे करायचे.  

२. कुसकरलेल्या केळ्यात रवा, मैदा आणि गूळ पूड घालून झाल्यावर त्यात चमचाभर बेकींग सोडा घालायचा. तसेच त्यात चमचाभर वेलची पूड घालायची. चमचाभर तूप घालायचे आणि गरम पाणी घालायचे. जास्त पातळ करु नका. थोडे घट्ट असे पीठ तयार करायचे आणि त्यात गरम पाणी अगदी गरजे पूरतेच घाला. व्यवस्थित मिक्स करायचे. छान एकजीव करुन घ्यायचे. त्यात काजू बदामाचे तुकडे घालायचे आणि मिक्स करायचे. नाही घातले तरी हरकत नाही. 

३. गॅसवर अप्पे पात्र ठेवायचे आणि गरम करायचे. अप्पे पात्र वापरताना कायम ते आधी गरम करायचे. ते गरम व्हायला जरा दोन मिनिटे लागतात. गार अप्पे पात्रावर अप्पे लावल्यावर ते सुटत नाहीत. चिकटून बसतात. त्यामुळे जरा पात्र गरम झाल्यावर त्यात तूप सोडायचे. सगळीकडे छान तूप लावायचे आणि मग चमच्याने अप्पे लावायचे. दोन्ही बाजूंनी मस्त खमंग होईपर्यंत शिजवायचे. वरती झाकण ठेवा आणि छान अप्पे तयार करुन घ्या.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स