Banana and Black Pepper Benefits : केळी खाणं सगळ्यांनाच आवडतं. सोबतच केळ हे एक सुपरफूड मानलं जातं. जे टेस्टी असण्यासोबतच आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतं. बरेच लोक वजन वाढवण्यासाठी किंवा हेल्दी नाश्ता म्हणूनही रोज केळी खातात. पण यासोबत जर एक आणखी गोष्टी मिक्स केली तर फायदेच फायदे मिळतील. ती गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये असणारी काळी मिरी पूड. हे कॉम्बिनेशन इतकं कमाल आहे की, फायदे वाचल्यावर रोज हेच खाल. चला तर पाहुयात याचे काय काय फायदे मिळतात.
पचनशक्ती सुधारते
केळं फायबरने भरलेलं असतं, जे पोट स्वच्छ ठेवायला मदत करतं. तर काळ्या मिरीत पायपेरिन नावाचं तत्व असतं, जे पचनासाठी आवश्यक एन्झाईम्सला सक्रिय करतं. दोन्ही एकत्र खाल्ल्यास पचन तंत्र मजबूत होतं, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट फुगण्याची समस्या कमी होऊ शकते.
लगेच ऊर्जा मिळते
केळ्यात ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोजसारख्या नैसर्गिक साखरेचा समावेश असतो, ज्यामुळे आपल्याला लगेच ऊर्जा मिळते. काळी मिरी ही ऊर्जा शरीरात लवकर शोषली जाण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी किंवा वर्कआउटपूर्वी हे कॉम्बिनेशन खाल्ल्यास दिवसभर ताकद टिकून राहते आणि थकवा कमी होतो.
वजन कंट्रोलमध्ये राहतं
केळी खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे जास्त काही खाणं टाळलं जातं. काळी मिरी थर्मोजेनेसिस वाढवते म्हणजे शरीराचं तापमान किंचित वाढवतं, ज्यामुळे कॅलरीज अधिक वेगाने बर्न होतात. त्यामुळे हे मिश्रण वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतं.
हाडं मजबूत राहतात
केळ्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं, जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. काळ्या मिरीत मॅंगनीज असतं, जे हाडांसाठी चांगलं मानलं जातं. या सर्व पोषक तत्वांच्या एकत्र मिश्रणाने हाडं मजबूत आणि निरोगी राहतात.
मूड चांगला राहतो, तणाव कमी होतो
केळ्यात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अॅसिड असतं, जे शरीरात ‘सेरोटोनिन’मध्ये बदलतं. सेरोटोनिनला ‘फील-गुड हार्मोन’ म्हटलं जातं, कारण ते मूड चांगलं ठेवतं आणि तणाव कमी करतं.
इम्युनिटी वाढते
काळी मिरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मिळतं. केळ्यात व्हिटामिन C आणि B6 असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. एकत्र घेतल्यास हे मिश्रण इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी उत्तम आहे.
कसं खावं?
एक पिकलेलं केळं घ्या, त्यावर चिमूटभर काळी मिरी पूड शिंपडा आणि रोज खा.
