lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा घरच्याघरी- लगेच रेसिपी बघा, कूल कूल कलिंगड

आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा घरच्याघरी- लगेच रेसिपी बघा, कूल कूल कलिंगड

Summer Special Watermelon Mojito Recipe: नेहमी त्याच त्या चवीचा ज्यूस करण्यापेक्षा कधीतरी स्वत:साठी, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी वॉटरमेलन मोजिटो करून पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 12:52 PM2024-04-22T12:52:06+5:302024-04-22T19:08:33+5:30

Summer Special Watermelon Mojito Recipe: नेहमी त्याच त्या चवीचा ज्यूस करण्यापेक्षा कधीतरी स्वत:साठी, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी वॉटरमेलन मोजिटो करून पाहा.

summer special watermelon mojito recipe, how to make watermelon mojito at home, mojito recipe by Kunal kapoor | आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा घरच्याघरी- लगेच रेसिपी बघा, कूल कूल कलिंगड

आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा घरच्याघरी- लगेच रेसिपी बघा, कूल कूल कलिंगड

Highlightsतुमच्याघरी येणाऱ्या पाहुण्यांना वेलकम ड्रिंक म्हणून हा पदार्थ द्या. त्याची आल्हाददायक चव घेऊनच पाहुणे अगदी खुश होऊन जातील. 

उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात गर्द हिरव्या रंगाचे मोठमोठाले टरबूज दिसू लागतात. गारेगार कलिंगड किंवा टरबूज भर उन्हाळ्यात खाण्याचा आनंद काही वेगळाच. कोणी टरबूज मीठ टाकून खातं तर कोणी चाट मसाला टाकून. एकंदरीतच काय की आपण टरबूज नेहमीच खातो. किंवा बऱ्याचदा त्याचा ज्यूस करून तो पितो. पण यापेक्षा काहीतरी वेगळं आता करून पाहा. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी टरबूजाचं वॉटरमेलन मोजिटो कसं करायचं (summer special watermelon mojito recipe), याची एक अतिशय सोपी रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे(how to make watermelon mojito at home). ही रेसिपी पाहून हे हॉटेलपेक्षाही भारी चवीचं मोजिटो कसं तयार करायचं ते एकदा पाहून घ्या. (mojito recipe by Kunal kapoor)

वॉटरमेलन मोजिटो करण्याची रेसिपी

 

साहित्य

टरबुजाच्या फोडीचे ७ ते ८ तुकडे

१ चमचा साखर

अर्ध्या लिंबाचा रस

नाकावरच्या व्हाईटहेड्स- ब्लॅकहेड्समुळे चेहरा खराब दिसतो? ३ होममेड स्क्रब- त्वचा होईल स्वच्छ

५ ते ७ बर्फाचे तुकडे

३ ते ५ टेबलस्पून सोडा

३ ते ४ पुदिन्याची पाने

 

कृती

सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात टरबुजाच्या फोडी, साखर, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस घाला आणि हे मिश्रण बारीक करून घ्या.

आता एक मोठी गाळणी घेऊन त्यातून हा टरबुजाचा रस गाळून घ्या. 

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

एका सर्व्हिंग ग्लासमध्ये सगळ्यात आधी ३ ते ४ बर्फाचे तुकडे टाका. त्यामध्ये टरबुजाचा ज्यूस टाका.

त्यानंतर थोडा सोडा घाला आणि सगळ्यात वर पुदिन्याच्या पानांचे तुकडे करून टाका.

थंडगार, चवदार वॉटरमेलन मोजिटो तयार. तुमच्याघरी येणाऱ्या पाहुण्यांना वेलकम ड्रिंक म्हणून हा पदार्थ द्या. त्याची आल्हाददायक चव घेऊनच पाहुणे अगदी खुश होऊन जातील. 

 

Web Title: summer special watermelon mojito recipe, how to make watermelon mojito at home, mojito recipe by Kunal kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.