Join us
Daily Top 2Weekly Top 5

Summer Special Recipe - आंबट कैरीची करा मस्त कोशिंबीर, रेसिपी वाचूनच सुटेल जिभेला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2026 08:55 IST

Summer Special Recipe - Make a delicious salad with raw mango, mouth watering recipe , must try : कैरीची करा ही चविष्ट कोशिंबीर. पाहा रेसिपी.

उन्हाळा आला की बाजारात कच्च्या कैरीची रेलचेल दिसू लागते. कैरीपासून अनेक पदार्थ तयार केले जातात, त्यापैकीच एक कैरीची कोशिंबीर हा अतिशय साधा आणि चविष्ट पदार्थ. आंबट चव असल्यामुळे ही कोशिंबीर उन्हाळ्यात खास आवडीने खाल्ली जाते. कैरीची कोशिंबीर जेवणात एक छान साईड डिश म्हणून खाता येते. (Summer Special Recipe - Make a delicious salad with raw mango, mouth watering recipe , must try)भात, वरण, पोळी किंवा भाकरीबरोबर ती खूप छान लागते. कैरीचा आंबटपणा आणि त्याची चटपटीत चव यामुळे साध्या जेवणालाही वेगळी चव मिळते. त्यामुळे अनेक घरांमध्ये उन्हाळ्यात जेवणात कैरीची कोशिंबीर हमखास असते. अगदी सोपी आहे. नक्की करुन पाहा. 

साहित्य कैरी, कांदा, लसूण, आलं, मोहरी, तेल, साखर, टोमॅटो, हळद, लाल तिखट, हिंग, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ

कृती१. छान ताजी आंबट कैरी घ्यायची. सोलायची गरज नाही. कैरी पाण्यात भिजवायची आणि स्वच्छ करायची. नंतर त्याचे लांब आणि पातळ काप करायचे. पातळच करा म्हणजे चव मस्त लागते. मसाले त्यात मुरतात. टोमॅटो बारीक चिरायचा. तसेच कांदा सोलायचा आणि छान बारीक चिरायचा. आलं किसून घ्यायचं. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. 

२. कैरी थोडा वेळ मीठ पाण्यात भिजत ठेवायची. नंतर पाणी काढून टाकायचे. कैरी छान मऊ होते. त्यात टोमॅटो घालायचा आणि  बारीक चिरलेला कांदाही घालायचा. त्यात बारीक चिरलेला ताजी निवडलेली कोथिंबीरही घालायची. लाल तिखट घालायचे आणि हळदही घालायची. गरजेनुसार मीठ घालायचे. थोडं हिंग घाला म्हणजे बाधत नाही आणि आवडीनुसार गरम मसालाही घालायचा. थोडाच घाला.   

३. एका फोडणीपात्रात थोडं तेल घ्यायचं, त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालायचे. जिरे छान फुलले की मस्तपैकी लसणाच्या बारीक चिरलेला लसूण घाला. आल्याचा किस घाला आणि फोडणी छान परतून घ्या. फोडणी गरमागरम मिश्रणावर ओतायची. तेल जास्त वापरले तरी चालते. म्हणजे कोशिंबीर छान मुरते. छान मिक्स करायचे. थोडावेळ मुरत ठेवायचे. भात, चपाती सगळ्यासोबत मस्त लागते. नक्की करुन पाहा.     

English
हिंदी सारांश
Web Title : Tangy Raw Mango Salad: A Summer Delight Recipe

Web Summary : Enjoy summer with a refreshing raw mango salad! This simple dish combines raw mango, onion, tomato, and spices. Temper with mustard seeds, cumin, garlic, and ginger for an explosion of flavor. Perfect with rice, roti, or as a side.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशलआंबा