Join us
Daily Top 2Weekly Top 5

Summer Special Drink - उन्हाळ्यात बडीशेपेचे सरबत म्हणजे पोटासाठी गारेगार चविष्ट औषध! पारंपरिक सरबतांचा सरताज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 16:27 IST

Summer Special Drink - homemade fennel syrup is a delicious and refreshing drink for the stomach in summer! : बडीशेपेचे सरबत घरी करा झटपट. सोपी रेसिपी.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पचन सुधारण्यासाठी मदत करणारे पेय म्हटले की बडीशेप सरबत हे एक उत्तम पर्याय ठरते. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली बडीशेप केवळ मुखवास म्हणूनच नाही तर औषधी गुणधर्मांनी भरलेली आहे. त्यामुळे तिचे सरबत बनवून पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बडीशेप सरबत प्यायचे फायदे अनेक आहेत. (Summer Special Drink - homemade syrup is a delicious and refreshing drink for the stomach in summer!)सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते शरीराला थंडावा देते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते, अशा वेळी बडीशेप सरबत प्यायल्याने शरीर शांत राहते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो. याशिवाय बडीशेप पचनक्रिया सुधारते.

जेवणानंतर जाणवणारा जडपणा, अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या कमी करण्यासाठी हे सरबत खूप उपयोगी ठरते. बडीशेपमध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच हे सरबत डोळ्यांसाठीही फायदेशीर मानले जाते. काही लोकांना उन्हाळ्यात डोळ्यांची आग होते किंवा कोरडेपणा जाणवतो, अशावेळी बडीशेपचे सेवन आराम देते. 

महिलांसाठीही बडीशेप सरबत उपयुक्त आहे. हार्मोनल बदलांमुळे होणाऱ्या काही त्रासांवर ते हलका दिलासा देते. तसेच शरीरातील पाणी संतुलित ठेवण्यास मदत करून डिहायड्रेशन टाळते. आता हे सरबत कसे तयार करायचे ते पाहूया. 

साहित्य बडीशेप, खडीसाखर, काळीमीरी, सैंधव मीठ, पुदिना, लिंबू, बर्फ , पाणी

कृती१. बडीशेप आणि खडीसाखर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. जेवढी बडीशेप त्याच्या अर्धी खडीसाखर असे प्रमाण ठेवा. त्यात चार ते पाच काळीमिरीचे दाणे घालायचे. सैंधव मीठ घालायचे. त्याची पुड वाटून घ्यायची. हवाबंद डब्यात साठवून ठेवायची. 

२. एका ग्लासमध्ये तयार पूड घ्यायची. त्यात लिंबाचा रस घालायचा. थोडी पुदिन्याची पाने घालायची. तसेच थोडा बर्फ घालायचा. सगळं मक्स करायचं आणि गारेगार प्यायचे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fennel Seed Sharbat: A cooling summer drink for digestion and health.

Web Summary : Fennel seed sharbat cools the body, aids digestion, and boosts immunity. Rich in antioxidants, it alleviates acidity, benefits eyes, and balances hormones. Easy to make with fennel seeds, sugar, pepper, salt, mint, lemon, and water.
टॅग्स :समर स्पेशलपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न