Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळा स्पेशल : प्या गुलकंद लस्सी-परफेक्ट ‘रोज लस्सी’ करण्याची सोपी रेसिपी-पोटाला गारवा हवाच..

उन्हाळा स्पेशल : प्या गुलकंद लस्सी-परफेक्ट ‘रोज लस्सी’ करण्याची सोपी रेसिपी-पोटाला गारवा हवाच..

Summer Special: Drink Gulkand Lassi - Easy recipe to make the perfect drink for summer : उन्हाळ्यात प्या गारेगार लस्सी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 14:14 IST2026-03-12T14:11:19+5:302026-03-12T14:14:44+5:30

Summer Special: Drink Gulkand Lassi - Easy recipe to make the perfect drink for summer : उन्हाळ्यात प्या गारेगार लस्सी.

Summer Special: Drink Gulkand Lassi - Easy recipe to make the perfect drink for summer | उन्हाळा स्पेशल : प्या गुलकंद लस्सी-परफेक्ट ‘रोज लस्सी’ करण्याची सोपी रेसिपी-पोटाला गारवा हवाच..

उन्हाळा स्पेशल : प्या गुलकंद लस्सी-परफेक्ट ‘रोज लस्सी’ करण्याची सोपी रेसिपी-पोटाला गारवा हवाच..

उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांची गरज जास्त जाणवते. अशा वेळी अनेकांना सहज आठवण होते ती म्हणजे लस्सी. दह्यापासून तयार होणारे हे पेय केवळ चविष्टच नाही तर शरीराला ताजेतवाने ठेवणारेही आहे. त्यामुळेच अनेकांना लस्सी प्यायला आवडते आणि ती कंटाळवाणीही वाटत नाही. त्यात विविध प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे रोज लस्सी. 

लस्सीची खास गोष्ट म्हणजे पोटावर हलकी, थंडावा देणारी आणि पचायला सोपी. उन्हाळ्यात शरीरातून घामामुळे पाणी आणि मीठ कमी होतं. अशा वेळी लस्सी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर किंवा गरमीमध्ये लस्सी पिणे अनेकांना आवडते. त्यात जर गुलकंद असेल तर त्याची चव आणखी जबरदस्त लागते. पाहा रेसिपी. 

साहित्य 
दही, गुलकंद, रोज सिरप, साखर, वेलची पूड, पाणी, काजू, बदाम 

कृती
१. मिक्सरमधून साखर वाटून घ्यायची. मस्त पिठीसाखर तयार करायची. ती लवकर विरघळते आणि घट्टपणा चांगला येतो. गुलकंद गोड असतो. त्यामुळे जर अति तिखट आवडत नसेल तर साखर नाही घातली तरी हरकत नाही. 

२. एका खोलगट भांड्यात दही घ्यायचं. त्यात वेलची पूड घालायची. तसेच थोडं पाणी घालायचं, थोडं रोज सिरप घालायचं. सगळं मस्त एकरुप होऊ द्यायचं. मग रवीच्या मदतीने व्यवस्थित घुसळायचं. मिक्सरमध्ये त्याला फेस आणि घट्टपणा तसा फार छान येत नाही. तुम्हाला मिक्सर वापरायचा असेल तर तसंही करता येतं. 

३. लस्सी छान घट्ट आणि फेसाळलेली तयार झाली की फ्रिजमध्ये गार करत ठेवायची. बर्फ घालून घुसळली तर पातळ होते. त्यामुळे तयार करुन मग गार करत ठेवायची. काजू आणि बदाम किसून किंवा बारीक चिरुन घ्यायची. लस्सी वर घालायचे. मस्त गारेगार लस्सीचा आस्वाद घ्या.  

Web Title : गर्मी से राहत: ताज़गी भरी रोज़ लस्सी रेसिपी, गर्मी में ठंडक

Web Summary : रोज़ लस्सी, दही से बना एक ठंडा पेय, गर्मी के लिए एकदम सही है। इस आसान रेसिपी में दही, गुलकंद, रोज़ सिरप और इलायची जैसे तत्व हैं। दोपहर के भोजन के बाद या गर्मी के दिन इस ताज़ा और स्फूर्तिदायक पेय का आनंद लें।

Web Title : Beat the Heat: Refreshing Rose Lassi Recipe for Summer Coolness

Web Summary : Rose lassi, a cooling yogurt-based drink, is perfect for summer. This easy recipe uses ingredients like yogurt, gulkand, rose syrup, and cardamom. Enjoy this refreshing and energizing drink after lunch or on a hot day for a quick cool-down.