Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Summer Special Chat : गारेगार दही आलू चाट खा पोटभर..उन्हाळ्यात दुपारची मजा आणि खाण्याची चंगळ, पाहा रेसिपी

Summer Special Chat : गारेगार दही आलू चाट खा पोटभर..उन्हाळ्यात दुपारची मजा आणि खाण्याची चंगळ, पाहा रेसिपी

Summer Special Chat: Eat a bowl of thick curd and potato chaat, Summer afternoon fun and a treat to eat, see the recipe : उन्हाळ्यात करा दही आलू चाट. एकदम चविष्ट रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 14:24 IST2026-03-26T14:16:37+5:302026-03-26T14:24:42+5:30

Summer Special Chat: Eat a bowl of thick curd and potato chaat, Summer afternoon fun and a treat to eat, see the recipe : उन्हाळ्यात करा दही आलू चाट. एकदम चविष्ट रेसिपी.

Summer Special Chat: Eat a bowl of thick curd and potato chaat, Summer afternoon fun and a treat to eat, see the recipe | Summer Special Chat : गारेगार दही आलू चाट खा पोटभर..उन्हाळ्यात दुपारची मजा आणि खाण्याची चंगळ, पाहा रेसिपी

Summer Special Chat : गारेगार दही आलू चाट खा पोटभर..उन्हाळ्यात दुपारची मजा आणि खाण्याची चंगळ, पाहा रेसिपी

चाटचे पदार्थ म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं. करायला सोपे आणि चवीला एकदम मस्त असे हे पदार्थ घरोघरी केले जातात. विकत ३० ते ६० रुपयांना मिळणारे चाट घरी तेवढ्याच किंमतीत पोटभरीचे करता येते. फारच सोपे प्रकार असतात. त्यापैकी एक म्हणजे आलू चाट. (Summer Special Chat: Eat a bowl of thick curd and potato chaat, Summer afternoon fun and a treat to eat, see the recipe)करायला अगदी सोपे पुऱ्या आणायचीही गरज नाही. दही बटाटा हे मुख्य पदार्थ बाकी सामान घरात नक्कीच असेल. पाहा दही आलू चाट करण्याची सोपी रेसिपी. 

साहित्य 
बटाटा, दही, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चिंच, गूळ, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, जिरे पूड, काळीमिरी पूड, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना, शेव, तेल, डाळिंब्यांचे दाणे 

कृती
१. बटाटा उकडून घ्यायचा, त्याचे लहान तुकडे करायचे. अगदी लहान नाही. मध्यम तुकडे करा आणि पॅनमध्ये थोड्या तेलावर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा सोलायचा आणि मस्त बारीक चिरायचा. टोमॅटोही बारीक चिरायचा. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात निवडलेली कोथिंबीर घ्यायची, त्यात सोललेल्या लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. तसेच हिरवी मिरची घालायची. आल्याचा तुकडा घालायचा. पुदिना घालायचा आणि त्याची पेस्ट वाटून घ्यायची. गरजेनुसार पाणी घाला. त्यात थोडे मीठही घाला. 

३. एका वाटीत गरम पाणी घ्यायचे. त्यात चिंच भिजवायची, चिंच जरा मऊ झाली की हाताने कुस्करुन घ्यायची. नंतर ते पाणी गाळून घ्यायचे. चोथा काढून टाकायचा आणि चिंचेचा कोळ तयार करायचा. किसलेला गूळ घालून चिंच आणि गूळ जरा परतून घ्यायचं. गूळ विरघळला की चटणी गार करत ठेवायची. दह्यात मीठ घालून दही फेटून घ्यायचं. 

४. एका ताटलीत खाली दही घ्यायचं, त्यावर बटाटे ठेवायचे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो पसरवायचा. लाल तिखट, मीठ चाट मसाला जिरे पूड सगळे मसाले पसरवायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यावर थोडे दही घालायचे आणि मग चिंचेची चटणी घालायची. हिरवी चटणी घालायची. वरुन शेव घालायची. थोडे बटाटे घालायचे आणि डाळिंब्याचे दाणे घालायचे. दही थंड असेल तर आणखी चव मस्त लागते.   

Web Title : गर्मी का विशेष व्यंजन: दही आलू चाट बनाने की आसान विधि

Web Summary : घर पर दही आलू चाट बनाकर गर्मी को मात दें! यह आसान रेसिपी आलू, दही और आसानी से उपलब्ध मसालों का उपयोग करती है। बाजार से चाट खरीदने के बजाय घर पर ही स्वादिष्ट नाश्ते का आनंद लें। धनिया, सेव और अनार के दानों से सजाएं।

Web Title : Cooling Summer Treat: Easy Dahi Aloo Chaat Recipe for Hot Days

Web Summary : Beat the heat with homemade Dahi Aloo Chaat! This simple recipe uses potatoes, yogurt, and readily available spices. Skip the store-bought chaat and enjoy a satisfying, flavorful snack at home. Garnish with cilantro, sev, and pomegranate seeds.