Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत

Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत

Summer Special : कमी कष्टात जिभेचे चोचले पुरवणारी सुकी भेळ म्हणजे उन्हाळ्यात टी टाइम परफेक्ट स्नॅक्स आहे, यातला सिक्रेट मसाला वाढवेल खरी लज्जत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:02 IST2026-04-08T16:44:49+5:302026-04-08T17:02:49+5:30

Summer Special : कमी कष्टात जिभेचे चोचले पुरवणारी सुकी भेळ म्हणजे उन्हाळ्यात टी टाइम परफेक्ट स्नॅक्स आहे, यातला सिक्रेट मसाला वाढवेल खरी लज्जत!

Summer Special: Bhel is always eaten, but this 'secret' spice will enhance the taste of dry Bhel | Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत

Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत

रणरणत्या उन्हात जड अन्न खाण्यापेक्षा काहीतरी हलकं आणि जिभेला चव देणारं खावंसं वाटतं. अशा वेळी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी म्हणजे 'कैरीची सुकी भेळ'. ही भेळ चवीला आंबट-गोड-तिखट अशी भन्नाट लागते आणि कमी कॅलरी असल्यामुळे डाएट करणाऱ्यांसाठी एक उत्तम स्नॅक्स आहे.

साहित्य :

कुरमुरे (चुरमुरे): ४-५ वाट्या

कैरी: अर्धी (बारीक चिरलेली)

कांदा: १ मध्यम (बारीक चिरलेला)

टोमॅटो: १ लहान (बारीक चिरलेला)

बारीक शेव: गरजेनुसार

मसाल्यासाठी: मूठभर पुदिना, कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, मीठ आणि थोडी साखर.

सर्व्हींगसाठी : बारीक चिरलेली कोथिंबीर, मसाला शेंगदाणे 

कृती :

१. कोरडे वाटण तयार करा: सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि साखर घ्या. यात पाण्याचा वापर न करता कोरडे मिश्रण तयार करून घ्या. यामुळे सुकी भेळेची लज्जत वाढते. 

२. मिश्रण एकत्र करा: एका मोठ्या भांड्यात कुरमुरे घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कैरीचे तुकडे घाला.

३. मसाला मिक्स करा: आता तयार केलेले हिरवे वाटण कुरमुऱ्यांवर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

४. फायनल टच: वरून चवीनुसार मीठ, साखर आणि बारीक शेव घाला. तुम्ही यात मसाला शेंगदाणेही घालू शकता. 

५. सर्व्ह करा: ही भेळ तयार झाल्याबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लगेच आस्वाद घ्या. 

ही भेळ 'डाएट फ्रेंडली' का आहे?

लो कॅलरी: कुरमुरे पचायला हलके असतात.

फायबर आणि व्हिटॅमिन्स: कैरी, कांदा आणि टोमॅटोमुळे शरीराला नैसर्गिक फायबर आणि व्हिटॅमिन सी मिळते.

तेलाचा शून्य वापर: या रेसिपीमध्ये कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, ज्यामुळे ही एक 'गिल्ट-फ्री' स्नॅक डिश ठरते.

Web Title : गर्मी में मसाला: गुप्त मसाला सूखे भेल का स्वाद बढ़ाएगा!

Web Summary : कच्चे आम की सूखी भेल से गर्मी को मात दें। मुरमुरे को कच्चे आम, प्याज, टमाटर और एक विशेष सूखे पुदीना-धनिया मसाला के साथ मिलाएं। यह फाइबर से भरपूर नाश्ता मिनटों में तैयार!

Web Title : Spice Up Summer: Secret Masala Elevates Dry Bhel Delight!

Web Summary : Beat the heat with tangy, low-calorie 'Kairi Sukhi Bhel'. Mix puffed rice with raw mango, onion, tomato, and a special dry mint-coriander masala. A guilt-free, fiber-rich snack ready in minutes!