Join us
Daily Top 2Weekly Top 5

Summer Special : चमचाभर बडीशेप आरोग्यासाठी चांगली , तोंडाची दुर्गंधी घालवणे ते पचन सुधारणे अनेक फायदे ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 17:15 IST

Summer Special: A teaspoon of fennel seeds are good for health, with many benefit, improves digestion as well : बडीशेप आरोग्यासाठी चांगली पाहा कशी खावी.

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारी बडीशेप ही फक्त चव वाढवणारी मसाल्याची वस्तू नाही, तर ती आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी मानली जाते. जेवणानंतर तोंडाला सुगंध यावा म्हणून खाल्ली जाणारी बडीशेप आपल्या शरीरासाठी मोठी फायदेशीर असते. (Summer Special: A teaspoon of fennel seeds are good for health, with many benefit, improves digestion as well)आयुर्वेदातही बडीशेपेला विशेष स्थान दिले गेले आहे.

बडीशेपेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पचन सुधारण्याची तिची क्षमता. जेवणानंतर थोडीशी बडीशेप खाल्ल्यास अन्न लवकर पचते आणि गॅस, अॅसिडिटी यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो. पोट फुगणे किंवा जड वाटणे अशा समस्या कमी करण्यासाठीही बडीशेप उपयोगी ठरते. उन्हाळ्यात बडीशेप शरीराला थंडावा देण्याचे काम करते. बडीशेपेचे पाणी किंवा सरबत प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होते आणि डिहायड्रेशनपासूनही बचाव होतो. त्यामुळे उष्णतेच्या दिवसांत तिचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी बडीशेप अत्यंत प्रभावी आहे. तिच्यातील नैसर्गिक सुगंध आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे तोंड ताजेतवाने राहते. म्हणूनच अनेक ठिकाणी जेवणानंतर बडीशेप खाल्ली जाते. तसेच बडीशेपेमुळे तोंडातून येणारा कांद्याचा किंवा रस्स्याचा वास कमी होतो. 

महिलांसाठीही बडीशेप उपयुक्त मानली जाते. हार्मोनल बॅलन्स राखण्यास ती मदत करते आणि मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठीही तिचा उपयोग होतो. काही लोक बडीशेपेचा काढा करुनही पितात, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. कारण बडीशेप उष्णता कमी करते. पाळीमुळे शरीरातील वाढते.  डोळ्यांच्या आरोग्यासाठी बडीशेप फायदेशीर असल्याचे मानले जाते. नियमित सेवन केल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच त्वचेसाठीही ती चांगली आहे, कारण तिच्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचा निरोगी ठेवतात.

बडीशेपेचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो. ती थेट खाऊ शकता, पाण्यात उकळून काढा बनवू शकता, सरबत तयार करू शकता किंवा मसाल्यांमध्ये वापरू शकता. काही जण बडीशेप भाजूनही खातात, ज्यामुळे तिची चव आणखी वाढते. उन्हाळ्यात तर खायलाच हवी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fennel Seeds: Health Benefits, Fresh Breath, and Improved Digestion

Web Summary : Fennel seeds aid digestion, freshen breath, and cool the body in summer. They balance hormones, ease menstrual pain, and may improve vision. Enjoy it in various forms.
टॅग्स :समर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहेल्थ टिप्स