Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Summer Recipes : उन्हाळ्यात करा थंडावा देणारा नाश्ता, काकडीचे धिरडे खा पोटभर अजिबात बाधत नाही

Summer Recipes : उन्हाळ्यात करा थंडावा देणारा नाश्ता, काकडीचे धिरडे खा पोटभर अजिबात बाधत नाही

Summer Recipes: Make a cooling breakfast in summer, eat cucumber Dhirda : चवीला मस्त आणि करायला सोपं. नक्की करा काकडीचं धिरडं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 13:48 IST2026-03-31T13:46:32+5:302026-03-31T13:48:19+5:30

Summer Recipes: Make a cooling breakfast in summer, eat cucumber Dhirda : चवीला मस्त आणि करायला सोपं. नक्की करा काकडीचं धिरडं.

Summer Recipes: Make a cooling breakfast in summer, eat cucumber Dhirda | Summer Recipes : उन्हाळ्यात करा थंडावा देणारा नाश्ता, काकडीचे धिरडे खा पोटभर अजिबात बाधत नाही

Summer Recipes : उन्हाळ्यात करा थंडावा देणारा नाश्ता, काकडीचे धिरडे खा पोटभर अजिबात बाधत नाही

नाश्त्यासाठी काय करावं हा नेहमीचाच प्रश्न आहे. काही पदार्थ असे ही असतात जे करायला अगदी सोपे असतात फक्त आपल्याला त्या रेसिपी माहिती नसतात. असाच एक धिरड्याचा प्रकार म्हणजे काकडीचं धिरडं. करायला सोपं आणि चवीला मस्त. (Summer Recipes: Make a cooling breakfast in summer, eat cucumber Dhirda )एकदा नक्की करुन पाहा. उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी या रेसिपी अगदी योग्य ठरतात. 

साहित्य 
काकडी, तांदूळ पीठ, लसूण, हिरवी मिरची, रवा, बेसन, आलं, कांदा, गाजर, कोथिंबीर, जिरे, मीठ, कडीपत्ता, तेल, पाणी 

कृती
१. छान ताजी काकडी सोलून घ्यायची, गोडसर असेल तर चव मस्त लागते. त्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात थोडे तांदूळ पीठ घ्यायचे. तसेच थोडं बेसन घालायचं आणि थोडा रवा घालायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घालायच्या. आल्याचा तुकडे घालायचा. त्यात पाणी घाला आणि मिश्रण वाटून घ्यायचं. मस्त एकजीव वाटलं जायला हवं , जरा पातळच करा. 

२. एखादा कांदा सोलून घ्या आणि बारीक चिरा. गाजरही सोलून घ्यायचे आणि किसून घ्यायचे. कोथिंबीरीची जुडी निवडायची आणि स्वच्छ करायची. बारीक चिरायची. कडीपत्याची पानेही हाताने तोडून त्याचे तुकडे करायचे. तयार केलेल्या मिश्रणात सगळ्या भाज्या घालायच्या. तसेच जिरे घालायचे चवीनुसार मीठ घालायचे. तुम्हाला आवडणाऱ्या इतरही भाज्या वापरु शकता. 

३. मिश्रण ढवळायचे आणि गरजेनुसार पाणी घालायचे. तवा गरम करायचा आणि तव्याला तेल लावायचे. तवा जरा तापला की त्यावर तयार मिश्रण ओतायचे. व्यवस्थित पातळ थर पसरवायचा. बाजूने तेल सोडायचे आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची. नंतर पलटून दुसरी बाजू कुरकुरीत होईपर्यंत परतायची. गरमागरम धिरडे खा. दही , लोणचे किंवा इतरही आवडत्या तोंडीलावण्यासोबत खा.   

Web Title : गर्मी में ठंडक: खीरे का ढिरडा, एक पौष्टिक नाश्ता

Web Summary : खीरे के ढिरडे के साथ गर्मी को मात दें! इस सरल रेसिपी में खीरा, चावल का आटा और मसाले हैं। सब्जियों के साथ मिलाएं, सुनहरा होने तक तवे पर पकाएं, और ठंडे और स्वस्थ नाश्ते के लिए दही या अचार के साथ आनंद लें।

Web Title : Cooling Summer Recipe: Cucumber Dhirde - A Nutritious Breakfast Treat

Web Summary : Beat the summer heat with refreshing cucumber dhirde! This simple recipe uses cucumber, rice flour, and spices. Mix with vegetables, cook on a griddle until golden, and enjoy with yogurt or pickle for a cooling and healthy breakfast.