Join us

साखर की गूळ... काय जास्त फायदेशीर? जाणून घ्या, दोघांची न्यूट्रीशन व्हॅल्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 16:04 IST

कोणताही गोड पदार्थ हा साखर आणि गुळाशिवाय बनवता येत नाही.

भारतात असे बरेच लोक आहेत ज्यांना गोड पदार्थ खायला आवडतात. अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर खूप केला जातो. तर काही जण गूळ देखील वापरतात. भारतात चहा आणि कॉफीचे खूप चाहते आहेत. चहा आणि कॉफीमध्येही साखर वापरतात. तर काही जण गुळाचा चहा पितात. चहा आणि गूळ यापैकी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय आहे आणि कशामध्ये न्यूट्रीशन व्हॅल्यू जास्त आहे ते जाणून घेऊया...

साखर की गूळ... काय जास्त फायदेशीर?

कोणताही गोड पदार्थ हा साखर आणि गुळाशिवाय बनवता येत नाही. गूळ आणि साखर दोन्ही उसाच्या रसापासून बनवले जातात. साखर आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे साखरेऐवजी गूळ खाणं अधिक चांगलं आहे.

गुळाची न्यूट्रीशन व्हॅल्यू 

गुळामध्ये कॅलरीजसह व्हिटॅमिन्स असतात. कार्बोहायड्रेट देखील असतात. त्यामुळे शरीरात जास्त काळ ऊर्जा टिकून राहते. त्यात तुमचे शरीर डिटॉक्स करण्याची क्षमता देखील आहे. त्याचे अँटिऑक्सिडंट गुण तुमच्या शरीरातील पेशींना सुरक्षित ठेवतात आणि स्नायूंना थकवा येण्यापासून रोखतात. 

गूळ पूर्णपणे नैसर्गिक आहे. हा कोणत्याही केमिकलशिवाय तयार केला जातो. गुळामध्ये मिनरल्स, मॅग्नेशियम, आयर्न, फायबर आणि फॉस्फरस असतात. गुळाची न्यूट्रीशन व्हॅल्यू - ३८३ कॅलरीज, ४ ग्रॅम मॉयश्चर, ० प्रोटीन, ० फॅट, १ ग्रॅम मिनरल, १ ग्रॅम फायबर, ९९ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ८० मिलीग्राम कॅल्शियम, ४० ग्रॅम फॉस्फरस, ३ मिलीग्राम आयर्न असतं.

साखरेची न्यूट्रीशन व्हॅल्यू 

गूळ चांगला आणि नैसर्गिक असतो. साखर नैसर्गिक नाही. साखर बनवण्यासाठी प्रथम उसाचा रस उकळला जातो. यानंतर क्रिस्टलला ब्लीच केलं जातं. साखरेमध्ये ग्लुकोज असतं जे उर्जेचा मुख्य स्रोत आहे. पण जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

जास्त साखर खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर मोठा परिणाम होतो. तसेच टाइप २ मधुमेह होण्याचा धोका असतो. साखरेमध्ये कोणतेही पोषक घटक नसतात. साखरेची न्यूट्रीशन व्हॅल्यू - ३८७ कॅलरीज, ० ग्रॅम फॅट, २ मिलीग्राम पोटॅशियम, ९५.९८ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ० ग्रॅम प्रोटीन असतात.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य