भरली भेंडी, भरली वांगी, भरला बटाटा आदी भाज्या आपण सतत खात असतो. चवीला मस्त आणि करायला सोप्या असतात. शिजायला लागतो तेवढाच वेळ बाकी पटकन होणारी भाजी प्रकार आहे. मात्र कधी भरला टोमॅटो खाल्ला आहे का? (Stuffed Tomato - a delicious recipe, very simple - tasty and easy to make )चवीला एकदम मस्त आणि करायला सोपी रेसिपी आहे. त्यामुळे नक्की करुन पाहा. एकदा तरी कराच परत परत कराल. लहान मुलांनाही आवडेल.
साहित्य टोमॅटो, जाड शेव, शेंगदाणे, पांढरे तीळ, हळद, मीठ , लाल तिखट, धणे पूड, कोथिंबीर, तेल, पाणी, लसूण, जिरे
कृती१. ताजे भरलेले मस्त टोमॅटो घ्यायचे. त्याला मधोमध काप द्यायचा. जसे भरली वांगीसाठी चिरता अगदी तसेच. दोन काप द्यायचे. अर्ध्यापर्यंत कापायचे. म्हणजे त्याचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची.
२. मिक्सरच्या एका भांड्यात थोडे पांढरे तीळ घ्यायचे. त्याच थोडी जाड शेव घालायची. थोडे शेंगदाणे घालायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घालायच्या. त्याची पूड वाटून घ्यायची. सुकी पूड तयार होते. मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तसेच चवीनुसार मीठ घालायचे. हळद घालायची. तसेच धणे पूड घालायची. थोडं लाल तिखट घालायचं. सगळं मिक्स करायचं. मसाला छान एकजीव करायचा.
३. तयार मसाला टोमॅटोमध्ये व्यवस्थित भरायचा, छान कोंबून भरायचा. सगळे टोमॅटो भरुन झाले की काही मिनिटे झाकून ठेवायचे. कढईत तेल घ्यायचे. तेल गरम झाले की त्यात जिरे घालायचे. जिरे छान फुलले की त्यात भरलेले टोमॅटो नीट लावायचे आणि परतून घ्यायचे. झाकून ठेवायचे एक वाफ काढायची. टोमॅटो शिजले जरा रंग बदलला की पलटून दुसरी बाजूही परतायची.
४. शेवटी उरलेला मसाला त्यात ओतायचा आणि थोडं पाणी घालायचं. ढवळायचं आणि मग त्यात पाणी ओतायचं. पाणी घाातल्यावर झाकण ठेवा आणि वाफ काढून घ्या. ग्रेव्ही जरा घट्ट होते. टोमॅटोही ग्रेव्हीमध्ये मस्त मुरतात. गरमागरम भाजी पोळी किंवा भातासोबत खा. भाकरीशीही मस्त लागते.
Web Summary : Try this easy stuffed tomato recipe! Core tomatoes, fill with a spicy mix of sesame seeds, peanuts, and spices. Cook in a pan until tender. Enjoy with roti or rice for a delicious meal.
Web Summary : यह आसान भरवां टमाटर रेसिपी आजमाएं! टमाटर को कोर करें, तिल, मूंगफली और मसालों के मसालेदार मिश्रण से भरें। नरम होने तक कड़ाही में पकाएं। स्वादिष्ट भोजन के लिए रोटी या चावल के साथ आनंद लें।