इडली (Idli) म्हटलं की अनेकांचा आवडता नाश्ता आहे. साध्या इडलीला एक चटपटीत आणि चविष्ट ट्विस्ट द्यायचे असेल, तर 'स्टफ इडली' हा एक उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी अतिशय पौष्टिक आणि चवदार ठरते. (Stuff Idli For Breakfast)
यात आपण इडलीच्या पिठात बटाट्याचे किंवा भाज्यांचे तिखट सारण भरतो, ज्यामुळे चटणीशिवाय सुद्धा ही इडली चविष्ट लागते. स्टफ इडली करण्याची सोपी रेसिपी पाहूया. स्टफ इडली घरच्याघरी करणं एकदम सोपं आहे. यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. स्टफ इडलीसाठी घरी उपलब्ध असलेले साहित्यही वापरू शकता.
साहित्य
यासाठी सर्वप्रथम इडलीचे पीठ (तांदूळ आणि उडद डाळ भिजवून तयार केलेले) तयार असावे. सारण बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, कढीपत्ता, मोहरी, हळद, चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर लागेल. चव वाढवण्यासाठी तुम्ही यात वाटाणे किंवा किसलेले गाजर देखील घालू शकता.
कृती
प्रथम गॅसवर कढईत थोडे तेल गरम करून त्यात मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची परतवून घ्या. त्यात हळद आणि आले-लसूण पेस्ट घालून उकडलेले बटाटे कुस्करून करून टाका. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून हे सारण नीट मिसळून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे चपटे गोळे (पॅटीससारखे) बनवून ठेवा.
आता इडली पात्राला थोडे तेल लावून घ्या. प्रत्येक साच्यामध्ये प्रथम थोडे इडलीचे पीठ टाका. त्यावर तयार केलेल्या बटाट्याच्या सारणाचा एक गोळा ठेवा आणि पुन्हा वरून थोडे पीठ टाकून सारण पूर्णपणे झाकून टाका. इडली नेहमीप्रमाणे १५-२० मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. तयार झालेली गरम स्टफ इडली साच्यातून काढून बाहेर घ्या.
ही स्टफ इडली दिसायला आकर्षक आणि चवीलाही अतिशय चविष्ट लागते, कारण इडली कापल्यावर मधून पिवळसर सारण दिसते. तुम्ही ही इडली ओल्या नारळाची चटणी, सांबार किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करू शकता. ही इडली चवीला थोडी तिखट आणि चटपटीत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.
Web Summary : Make flavorful stuffed idlis in minutes! This recipe combines idli batter with a spicy potato filling. It's a tasty and nutritious breakfast or lunchbox option that's easy to prepare and loved by all.
Web Summary : मिनटों में स्वादिष्ट स्टफ्ड इडली बनाएं! यह रेसिपी इडली बैटर को मसालेदार आलू भरने के साथ जोड़ती है। यह एक स्वादिष्ट और पौष्टिक नाश्ता या लंचबॉक्स विकल्प है जो बनाने में आसान है और सभी को पसंद आता है।