Sprouted Garlic Benefits : लसणाचा वापर केवळ जेवणाची टेस्ट वाढवण्यासाठीच नाही तर पूर्वीपासून वेगवेगळ्या उपचारांमध्येही केला जातो. कारण लसणामध्ये अनेक औषधी गुण असतात. जे अनेक गंभीर आजारात फायदेशीर ठरतात. आयुर्वेदात तर लसणाला खूप जास्त महत्व आहे. लसणामध्ये अॅलिसिन नावाचं तत्व असतं. तसेच यात व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असतात. इतकंच नाही तर यात मॅगनीज, सेलेनियम, कॅल्शिअमही असतं.
सामान्यपणे लसूण ठेचून किंवा तुकडे करून वापरला जातो. पण लसणाचा वापर करत असताना भरपूर लोक एक मोठी चूक करतात. ते कोंब आलेल्या लसणाकडे दुर्लक्ष करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कोंब आलेला लसूण बेकार नाही तर अधिक फायदेशीर असतो. हे आमचं नाही तर अनेक रिसर्चचं म्हणणं आहे.
कोंब आलेला लसूण अधिक फायदेशीर
NCBI वर प्रकाशित एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, वैज्ञानिकांनी हे मान्य केलं आहे की, लसणाला जर कोंब आले तर त्यातून आरोग्यासाठी भरपूर असे तत्व मिळतात.
वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या वेळी कोंब आलेल्या लसणातून अल्कोहोलिक अर्क काढले आणि त्यातील अॅंटी-ऑक्सीडेंट कॅपेसिटीची टेस्ट केली. जेव्हा यांचा रस रॅडिकल स्कॅवेंजिंग आणि ऑक्सीजन रॅडिकल अब्जॉर्बशन कॅपेसिटी टेस्ट केली तर आश्चर्यकारक रिझल्ट दिसून आला.
किती दिवसात कोंब आलेला लसूण अधिक फायदेशीर
वैज्ञानिकांना टेस्टमधून दिसून आलं की, ५ दिवसांपर्यंत कोंब आलेल्या लसणामध्ये जास्त अॅंटी-ऑक्सीडेंट कॅपेसिटी होती. तर कोंब न आलेल्या लसणामध्ये ही क्षमता कमी होती. त्याशिवाय लसणाला अंकुरित केलं तर यातील रसायनांची संरचानाही बदलली.
लसूण खाण्याचे फायदे
लसूण खाण्याचे आरोग्याला कितीतरी फायदे मिळतात. नियमितपणे लसूण खाल तर ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल कमी होतं. तसेच यातील तत्वांनी इम्यून सिस्टीम मजबूत होते. यात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे काही प्रकारच्या कॅन्सरचा धोकाही कमी होऊ शकतो. तसेच लसणाने गॅस, बद्धकोष्ठता, अपचन दूर होते. इतकंच नाही तर लसणानं शरीरातील चरबी कमी होते आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते.