Join us

मुंबई स्पेशल मसाला पाव करा फक्त १५ मिनिटांत, चव अगदी ठेल्यावर मिळते तशीच चमचमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2025 16:19 IST

Mumbai Special Masala Pav Recipe: मुंबईचा मसाला पाव आवडत असेल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Chef Kunal Kapur) यांनी शेअर केलेली ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा.(how to make Mumbai street style masala pav at home?)

ठळक मुद्देरेसिपी अतिशय सोपी असून खूप झटपट होणारी आहे.

रोज रोज तेच भाजी, पोळी, वरण भात असे पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि मग काहीतरी चमचमीत खाण्याची प्रचंड इच्छा होते. यातही अनेकांना सरळ रस्त्यावरच्या गाड्यावर जाऊन पाणीपुरी, भेळ, पावभाजी, मसाला पाव असं काहीतरी खाऊन यावंसं वाटतं (street food lover). पण सध्या पावसाचे दिवस आहे. त्यामुळे बाहेरचं खायला नको वाटतं. अशावेळी मसाला पाव खाण्याची खूप जबरदस्त इच्छा होत असेल आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेली मुंबई स्पेशल मसाला पाव रेसिपी एकदा ट्राय करून पाहा (Mumbai special masala pav recipe by Chef Kunal Kapur). रेसिपी अतिशय सोपी असून खूप झटपट होणारी आहे.(how to make Mumbai street style masala pav at home?)

 

मुंबई स्पेशल मसाला पाव रेसिपी

साहित्य

पाव लादी

२ लाल टोमॅटो

२ बारीक चिरलेले कांदे

मुसळधार पावसात भाज्या महागल्या? करा २ टोमॅटोंचा ठेचा फक्त ५ मिनिटांत, जेवणाचा बेत होईल मस्त

आल्याची पेस्ट आणि लसूण पेस्ट प्रत्येकी एकेक टी स्पून

१ किंवा २ अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची

लाल तिखट, गरम मसाला प्रत्येकी १ चमचा

१ टेबलस्पून पावभाजी मसाला

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

 

कृती 

सगळ्यात आधी तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये बटर आणि तेल समप्रमाणात घाला.

फ्रिजच्या दरवाज्याच्या रबरवर फंगस साचलं? २ सोपे उपाय- १० मिनिटांत काळवंडलेलं रबर होईल स्वच्छ 

बटर वितळल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा थोडा सोनेरी होईपर्यंत परतून झाला की त्यामध्ये पावभाजी मसाला, लाल तिखट, गरम मसाला घाला आणि सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. 

 

यानंतर या मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. त्यात थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून कढईवर झाकण ठेवून द्या. ५ मिनिटांनी वाफ आल्यावर सगळे पदार्थ मॅश करून घ्या.

ना केस गळणार ना पांढरे होणार! 'हा' घरगुती शाम्पू वापरा- विकतचे महागडे शाम्पू विसरून जाल

यामध्ये आता पावाचे तुकडे घाला आणि कढईतले सगळे पदार्थ एकदा हलवून घ्या. गरमागरम मसाला पाव तयार. हा पाव डिशमध्ये वाढून घेतल्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला. डाळिंबाचे दाणे, बारीक शेवही तुम्ही घालू शकता. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मुंबईकांदाटोमॅटो