Food Tips : रात्रीचा शिल्लक राहिलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाण्याची आपल्याकडे सगळ्यांनाच सवय असते. साध्या भाताला फोडणी दिली जाते किंवा तो तसाच पुन्हा गरम करून खाल्ला जातो. पण शिळ्या भाताबाबतची एक छोटीशी चूक गंभीर फूड पॉयजनिंगचं कारण ठरू शकते. याबाबत एमडी आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. एमी शाह यांनी त्यांच्या इन्स्ट्राग्रामवर लोकांना एक सल्ला दिला आहे.
डॉ. एमी शाह म्हणाल्या की, भात पुन्हा गरम करताना आपण एक अशी चूक करतो, ज्यामुळे पोटात इन्फेक्शन आणि फूड पॉयजनिंगचा धोका दुप्पट वाढतो. डॉ. एमी यांच्यानुसार, "ही चूक आपल्याला आजारी पाडू शकते आणि गंभीर स्थितीत आपल्याला हॉस्पिटलमध्येही जावं लागू शकतं".
फ्रिजमध्ये भात ठेवणं योग्य की अयोग्य?
सगळ्यात आधी डॉ. एमी यांनी एक सगळ्यात मोठा भ्रम दूर केला. अनेक लोक विचार करतात की, फ्रिजमध्ये ठेवलेला भात खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. पण सत्य काही वेगळंच आहे. डॉ. एमी सांगतात की, भात फ्रिजमध्ये ठेवणं मुळात आपल्यासाठी चांगलं असतं. जेव्हा आपण भात शिजवून, थंड झाल्यावर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवतो, तेव्हा त्यातील स्टार्च रेसिस्टेंट स्टार्चमध्ये बदलतो. हे आपल्या आतड्यांसाठी फार फायदेशीर आहे. याने ब्लड शुगर कंट्रोल राहते आणि पोटात गुड बॅक्टेरिया वाढतात.
मग धोका कशाचा?
मुळात खरा धोका भात फ्रिजमध्ये ठेवल्याने नाही तर फ्रिजमध्ये ठेवण्याआधी केलेल्या एका चुकीत आहे. डॉ. शाह यांच्यानुसार, सगळ्यात मोठी चूक ही आहे की, लोक शिजवलेला भात दिवसभर बाहेर ठेवतात. बरेच लोक असं करतात. त्यांना वाटतं असं केल्यानं काही होणार नाही. पण भात असाच बराच वेळ बाहेर ठेवल्याने त्यात 'बॅसिलस सेरियस' नावाचा घातक बॅक्टेरिया वाढू लागतो. मेडिकल स्कूलमध्येही डॉक्टरांना या धोक्याबाबत शिकवलं जातं. जर भात बेकार झाला तर त्याने फूड पॉयजनिंग होऊ शकतं.
भात खाण्याची योग्य पद्धत डॉ. एमी शाह यांनी भात खाण्याची योग्य पद्धत आणि स्टोर करण्याची योग्य पद्धत याबाबत माहिती दिली आहे.
लवकर थंड करा - भाज शिजवल्यानंतर तो जास्त वेळ बाहेर ठेवू नका. तो लवकर थंड करा.
फ्रिजमध्ये ठेवा - थंड झाल्यावर भात एका एअरटाइट डब्यात टाकून फ्रिजमध्ये ठेवा.
फक्त एकदा गरम करा - जेव्हा आपण भात पुन्हा खाणार असाल तर भात केवळ एकदाच गरम करा. पुन्हा पुन्हा गरम केल्यास धोका अधिक वाढतो.
