Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिळा भात फेकू नका; डॉक्टर सांगतात 'या' पद्धतीनं खा शिळा भात, भरपूर फायदे मिळतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 20:16 IST

Stale Rice Benefits : हेल्थ कंटेट क्रिएटर डॉ. करण राजन यांनी इंस्टाग्रावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, उरलेला भात खाणं कसं फायदेशीर ठरतं.

रात्री किंवा दुपारच्या जेवणानंतर भात उरला तर अनेकजण शिळं खायला लागू नये म्हणून भात फेकून देतात. योग्य पद्धतीन स्टोअर केल्यास तसंच रिहिट केल्यास तांदूळ फक्त सुरक्षित नाही तर तब्येतीसाठी चांगलाही मानला जातो. उरलेला भात खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. (Stale Rice Benefits)

हेल्थ कंटेट क्रिएटर डॉ. करण राजन यांनी इंस्टाग्रावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, उरलेला भात खाणं कसं फायदेशीर ठरतं. डॉ. करण राजन यांच्यामते कच्च्या तांदळात बॅक्टेरिया स्पोर्स असतात जे शिजवल्यानंतर जिवंत राहतात. जर तुम्ही शिजवलेला भात अनेक तास रूम टेम्परेचरवर ठेवाल तर त्यातील बॅक्टेरिया वेगानं वाढू शकतात त्यामुळे फूड पॉइजनिंगचा धोका वाढतो. (Doctors Says About Stale Rice Benefits)

उरलेला भात नीठ कसा ठेवावा?

तांदूळ शिजवल्यानंतर १ ते २ तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवा. जर जास्त प्रमाणात असेल तर एअरटाईलल कंटेनर्समध्ये ठेवू शकता. तांदूळ जवळपास ४ अंश डिग्री सेल्सियसवर किंवा त्यापेक्षा कमी तापमानात स्टोअर करा. या पद्धतीनं साठवून ठेवल्यास तांदूळ ३ ते ६ दिवस चांगला राहतो. एकाच भाताला वारंवार रिहीट करू नका.

घरच्या इडल्या कडक होतात? ८ टिप्स, मऊसूत-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या-पीठ दुप्पट फुलेल

शिळा भात हेल्दी का असतो

डॉ. राजन सांगतात की भात शिळा असेल तर त्यात रेजिस्टंट स्टार्च तयार होते जे एक प्रकारचे फायबर असते आणि हळू हळू शरीरात पचते. ज्यामुळे बॅक्टेरियांना पोषण मिळते. पचनक्रियाही चांगली राहते. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी तसंच पोट भरलेलं राहण्यासाठी शिळा भात उत्तम ठरतो. रात्रीचा उरलेला भात मातीच्या भांड्यात किंवा कोणत्याही भांड्यात पाणी घालून ठेवा.

भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? भात 'या' पद्धतीनं खा-ना वजन वाढणार ना शुगर, फिट राहाल

सकाळी त्यात थोडं, दही किंवा ताक घालून खाल्ल्यास त्याची चव आणि पौष्टीकता वाढते. शिळा भात खाताना इतकं लक्षात ठेवा की भात खराब झालेला नसावा. उन्हाळ्याच्या दिवसांत भात पाण्यात भिजवून ठेवणं जास्त सुरक्षित असतं. जर तुम्हाला डायबिटीस किंवा कफचा त्रास असेल तर शिळा भात खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't waste leftover rice; eat it this way for benefits!

Web Summary : Leftover rice is beneficial if stored correctly. Dr. Rajan suggests cooling rice quickly to prevent bacteria growth. Stale rice contains resistant starch, a fiber that aids digestion, controls blood sugar, and keeps you full. Add yogurt or buttermilk for enhanced taste and nutrition.
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्स