पालकाचं मस्त वरण आपण बरेचदा तयार करतो. चवीला अप्रतिमच लागतं. पण तुम्ही कधी पालकाची पातळ भाजी खाल्ली आहे का? या भाजीला काही जण ताकातला पालक म्हणतात. (Spinach With Buttermilk, Traditional Marathi Dish)पालकाचं पिठलं असंही काही जण म्हणतात. नाव कोणतंही वापरा चवीला काही तोड नाही. भारतात एकाच पदार्थाला अनेक नावं असतात. तसेच एकाच पदार्थाच्या अनेक रेसिपी असतात. अशीच एक रेसिपी म्हणजे ताकातला पालक. अनेक प्रकारांनी ही पातळ भाजी तयार केली जाते. (Spinach With Buttermilk, Traditional Marathi Dish)त्यातलाच एक प्रकार आरती वडगबाळकर हिने तयार करून दाखवला आहे. त्याची कृती पाहूया.
साहित्य: (Spinach With Buttermilk, Traditional Marathi Dish)
पालक, ताक, लसूण, हळद, कडीपत्ता, काश्मीरी लाल मिरची, तूप, शेंगदाणे, जीरं, चणाडाळ, बेसन, मेथीचे दाणे, हिंग, मीठ
कृती:
१. एका भांड्यात ताक घ्या. त्यामध्ये बेसन घाला. तांब्याभर ताकाला तीन चमचे बेसन चिक्कार झालं. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
२. कढईमध्ये तुपाची फोडणी तयार करायची. तुपामध्ये जीरं घाला. ते तडतडलं की त्यात कडीपत्ता घाला. मेथीचे दाणे घाला. हिंग घाला.लाल मिरची घाला.
३. नंतर त्यामध्ये दाणे घाला. चणाडाळ घाला. सगळं मस्त मिक्स करून परतून घ्या. त्यावर मग चिरलेला पालक घाला. ढवळून घ्या आणि मग अगदी थोडंसं पाणी घालून झाकून ठेवा. छान शिजू द्या.
४. आता तयार असलेले ताका-बेसनाचे मिश्रण त्यात हळूहळू ओता. त्यात गुठळ्या पडणार नाहीत याची काळजी घ्या. छान ढवळून झालं की, त्याला मस्त उकळी येऊ द्या. त्यात चवीपुरते माठ घाला.
५. बाजूला वेगळी फोडणी तयार करून घ्या. ज्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला. लाल मिरची घाला . आणि हळद घाला. ती फोडणी तयार झाल्यावर भाजीवर ओता.
गरमागरम खायला घ्या. भातावरती तूप घालून त्यावर ही भाजी वाढा आणि मस्त मिटक्या मारत खा. भाकरीशीही लाजवाब लागते. तसेच पोळीशीही खाऊ शकता. पौष्टिक, चविष्ट आणि भारतीय पाकपद्धतीने परिपूर्ण अशी ही भाजी नक्की खाऊन बघा.