Join us

२० रुपयांच्या पालकाच्या जुडीचे करा १०० कुरकुरीत पापड-न लाटता पालक पापड करण्याची रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:00 IST

Spinach Papad Recipe :दुपारच्या जेवणाला तोंडी लावणीसाठी हे पापड उत्तम पर्याय आहेत. साधारण वर्षभर हे पापड टिकून राहतील.

उन्हाळ्याच्या दिवसांत वर्षभर पुरतील असे पापड बनवले जातात. फक्त साबुदाणा बटाट्याचे पापड नाही तर इतर भाज्या वापरूनही तुम्ही पापड बनवू शकता.  (Summer Special Recipes) मुलं किंवा घरातील मोठी माणसंही पालक खायला नको म्हणतात अशावेळी तुम्ही त्यांना पालकच्या वेगवेगळ्या डिशेज खायला देऊ शकता. पालकाचे पापड करणंही खूप सोपं आहे. (Palak Papad Recipe)

पालकाचे पापड करण्यासाठी तुम्हाला १५ ते २० रूपयांची पालकाची जुडी विकत घ्यावी लागेल. त्यानंतर पापड करायला फार वेळ लागणार नाही. (How To Make Palak Papad At Home) एका जुडीत तुम्ही ८० ते १०० पापड आरामात बनवू शकता. दुपारच्या जेवणाला तोंडी लावणीसाठी हे पापड उत्तम पर्याय आहेत. साधारण वर्षभर हे पापड टिकून राहतील. (Spinach Papad Recipe)

विरजण नसेल तर दही कसं लावायचं? ४ ट्रिक्स- १५ मिनिटांत घट्ट, मलाईदार दही होईल तयार

पालकाचे पापड करण्याची सोपी रेसिपी (How To Make Palak Papad At Home)

1) पालकाचे पापड करण्यासाठी सगळ्यात आधी पालक व्यवस्थित धुवून चिरून घ्या. पालकात पाणी घालून व्यवस्थित पाणी काढून घ्या.  एका मिक्सरच्या भांड्यात चिरलेली पालक घालून त्यात लसूण, जीर घालून  पातळ पेस्ट तयार करून  घ्या.

2) पालकाची पेस्ट तयार केल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. तयार पालकाच्या मिश्रणात साबुदाण्याची पेस्ट घाला. भिजवलेले साबुदाणे बारीक करून त्याची पेस्ट पालकाच्या मिश्रणात घाला.

3) ३ वाटी पालकाचे मिश्रण असेल तर त्यात 5 वाट्या  पाणी असं प्रमाण घ्या. ५ वाटी पाणी ठेवा. त्यात रवा आणि पाणी घालून एक पातळ मिश्रण तयार करा. 

4) त्यात १ चमचा पापड खार आणि १ चमचा मीठ घाला. गॅसवर पातेलं ठेवा. १० मिनिटं शिजवल्यानंतर त्यात  तीळ, मिरचीची पेस्ट आणि बडीशेप घाला, अजून ५ मिनिटं शिजवल्यानंतर गॅस बंद करा. 

१ वाटी साबुदाण्यांचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; साबुदाणा-बटाटा पळी पापडांची रेसिपी

5) गॅस बंद केल्यानंतर एका प्लास्टीकच्या पेपरवर लहान आकाराचे पापड पसरवून घ्या. २ किंवा ३ दिवस कडक ऊन्हात सुकवल्यानंतर पापड तळून खाण्यासाठी तयार  असतील. 

6) हे पापड कढईत घातल्यानंतर मोठे फुलतात. त्यासाठी पापड व्यवस्थित सुकवणं गरजेचं असतं अन्यथा पापड व्यवस्थित फुलत नाही. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स