Join us
Daily Top 2Weekly Top 5

बटाटा आणि टोमॅटोचे झणझणीत भरीत म्हणजे जि‍भेचे चोचले पुरवण्याचा उत्तम पर्याय, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2026 17:29 IST

Spicy potato and tomato bharit is a great option to satisfy your tongue, see the recipe : चविष्ट असे बटाटा टोमॅटो भरीत नक्की करुन पाहा.

वांग्याचे भरीत आपण नेहमीच खातो. मात्र कधी तुम्ही  बटाटा आणि टोमॅटोचे भरीत खाल्ले का? अगदी साधी आणि बेसिक रेसिपी आहे. मात्र चवीला एकदम जबरदस्त. एकदा केली की पुन्हा नक्कीच कराल. बटाटा परतायला जास्त वेळ लागतो. (Spicy potato and tomato bharit is a great option to satisfy your tongue, see the recipe)मात्र शिजलेले बटाटा चवीला वेगळा लागतो. त्यामुळे परतूनच घ्यायचा. पाहा ही रेसिपी करण्याची रेसिपी. 

साहित्य बटाटा, टोमॅटो, तेल, लसूण, हिरवी मिरची, सुकी लाल मिरची, कांदा, कोथिंबीर, गरम मसाला, धणे पूड, जिरे, मीठ, लाल तिखट

कृती१. बटाटा सोलून घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. कांदा सोलून घ्यायचा आणि नंतर त्याचे पातळ लांब तुकडे करायचे. हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरची मधोमध चिरुन घ्यायची. कोथिंबीर निवडायची आणि स्वच्छ धुवायची. बारीक चिरायची. 

२. कढईत तेल गरम करायचे. त्यात लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या. कांदा तळून घ्यायचा. तसेच हिरवी मिरची आणि लाल मिरचीही तळून घ्यायची. तळून झाल्यावर गार होऊ द्यायचे. त्याच कढईत टोमॅटोचे तुकडे घालायचे. बटाट्याचे तुकडे घालायचे आणि खमंग परतून घ्यायचे. बटाटा शिजायला जास्त वेळ घेतो. 

३. टोमॅटो अगदी मऊ झाले आणि बटाटा पण छान मऊ झाला की काढून घ्यायचे, गार करायचे. गार झाल्यावर तळलेला कांदा,  हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरची, तसेच लसूण, सगळं एकत्र करा आणि हाताने कुस्करुन घ्या. ते कुस्करल्यावर बटाटा आणि टोमॅटोही कुस्करुन घ्यायचा. सगळं एकत्र करायचं आणि मग त्यात गरम मसाला घालायचा. तसेच धणे पूड घालायचे. जिरे घालायचे. 

४. सगळं एकत्र केल्यावर त्यात लाल तिखट आणि मीठ घालायचे. हाताने एकजीव करायचे. त्याचे मस्त भरीत तयार करायचे. हाताने छान एकजीव करायचे. भात किंवा भाकरीसोबत खा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Spicy potato and tomato bharta: A flavorful, easy recipe.

Web Summary : Try this simple yet delicious potato and tomato bharta. Fry potatoes, tomatoes, garlic, chilies, and onions. Mash together, add spices, and enjoy with rice or roti for a satisfying meal.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स