आमटी छान झणझणीत असेल तर भाताशी तोंडी लावायला इतर काहीही नसले तरी चालते. घट्ट चमचमीत आमटी आपण करतोच मात्र त्यात अनेक प्रकार असतात. गोडाची आमटी असते फोडणीची असते. (Sour-sweet-spicy tamarind jaggery Amati recipe)तसेच नारळाची असते वाटणाचीही असते. विविध प्रकार असतात. त्यातलाच एक मस्त प्रकार म्हणजे आंबट, गोड, तिखट अशा चवींनी परिपूर्ण चिंच गुळाची आमटी. करायची पद्धत जरा वेगळी आहे. पण नक्की आवडेल एकदा करुन पाहाच .
साहित्य
तूर डाळ, हळद, मीठ, लाल तिखट, हिंग, जिरे, मोहरी, कडीपत्ता, गोडा मसाला, गरम मसाला, पाणी, कोथिंबीर, गूळ, चिंच, तेल, आलं
कृती
१. तूर डाळ मस्त स्वच्छ धुऊन घ्या. (Sour-sweet-spicy tamarind jaggery Amati recipe)त्यात पाणी घाला तसेच चमचाभर हळद घाला आणि मस्त शिजवून घ्या. डाळ छान मऊ होऊ द्या. कुकरमध्येच लावा लवकर आणि व्यवस्थित शिजेल. डाळ शिजल्यावर चमच्याने जरा मऊ करुन घ्यायची.
२. एका कढईत चमचाभर तेल घ्या. तेल जरा गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी छान तडतडू द्या. मोहरी तडतडल्यावर त्यात चमचाभर जिरे घाला. जिरं छान फुलू द्या. जिऱ्याचा खमंग वास सुटल्यावर त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता छान परतून घ्यायचा.
३. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. सोलून झाल्यावर छान बारीक चिरून घ्यायच्या. किंवा मग ठेचून घ्यायच्या. फोडणीत लसूण घालायचा. त्यात किसलेले आले घाला. आलं लसूण छान परतून घ्या. मग त्यात हिंग घाला हिंग विसरायचे नाही. हिंगामुळे अन्न बाधत नाही. हळद घाला तसेच थोडे लाल तिखट घाला आणि मग गोडा मसाला घालायचा. गरम मसाला घालायचा. मस्त ढवळून घ्यायचे. आणि मग त्यात चमचाभर डाळ घालायची आणि थोडे पाणी घालायचे.
४. छान एकजीव करुन घ्यायचे. परतून घ्यायचे. त्यात चिंचेचा कोय घालायचा. चिंच गरम पाण्यात भिजवायची मग कुसकरून त्याचा गर काढून घ्यायचा गाळून चोथा टाकायचा चिंचेचा कोय करायला फारच सोपा आहे. चिंच घातल्यावर त्यात थोडा गूळ घालायचा. मग गूळ विरघळू द्यायचा. शेवटी त्यात उरलेली डाळ घालायची पाणी घालायचे आणि आमटी मस्त उकळवून घ्यायची. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गरमागरम भात त्यावर तूप आणि ही आंबट गोड आमटी खाऊन तर पाहा नक्कीच आवडेल.