Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुणी म्हणते पापड सॅलेड कुणी म्हणते पापड चुरी, २ मिनिटांत करा चुरचुर पापडाचा चटपटीत पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 08:55 IST

Some say papad salad, some say papad churi, make a spicy dish of crispy papad in 2 minutes : पापडाचा असा पदार्थ जो नक्की करायलाच हवा.

असे अनेक पदार्थ आहेत जे आपण लहानपणी फार आवडीने खायचो मात्र आता ते घरी केले जात नाहीत. खेळून दमून आल्यावर आईला काहीतरी खायला दे म्हटल्यावर बरेचदा ती मस्त तेल मीठ पापड करुन द्यायची. जास्त वेळ असेल तर त्याच पदार्थात कांदा, टोमॅटो घालून त्याची चव वाढवायची. हा पदार्थ तुम्हीही नक्कीच खाल्ला असेल. (Some say papad salad, some say papad churi, make a spicy dish of crispy papad in 2 minutes)पापाड चाट म्हणा किंवा चटपटीत पापड. चवीला एकदम भारी अशी रेसिपी आहे. पाच मिनिटांत तयार होणारा खाऊ नक्की करा.  

साहित्य पापड, कांदा, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट, तेल, मोहरी, कडीपत्ता, जिरं, टोमॅटो 

कृती१. पापड भाजून घ्यायचा. काही जण तळूनही घेतात. मात्र भाजलेल्या पापडाची चव जास्त छान लागते आणि तो जास्त पौष्टिक ठरतो. पापड भाजून घेतल्यावर त्याचा चुरा करायचा. अगदीच भुगा नाही जरा तुकडे तुकडे करायचे.  हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. कोथिंबीर निवडायची आणि स्वच्छ धुवायची. नंतर बारीक चिरायची. 

२. टोमॅटो बारीक चिरायचा. पापडाच्या चुऱ्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. तसेच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. एका फोडणी पात्रात तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरं घालायचं. कडीपत्ता घालायचा आणि मस्त फुलू द्यायचा. 

३. फोडणी जरा कोमट झाली की मग गॅस बंद असतानाच लाल तिखट घालायचे. गरम तेलात आणि गॅस चालू असताना फोडणी तिखट घातले तर ते जळते. त्यामुळे फोडणी कोमट झाल्यावरच तेल घाला आणि लगेच मिक्स करुन घ्या. पापडाच्या चुऱ्यावर ओता. चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करुन घ्या. बारीक मस्त कुरुम - कुरम खा. नरम होण्याआधीच खायचे. हा पदार्थ केल्या केल्या खाण्यासाठीच असतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Quick & Easy Papad Salad/Churi Recipe: A Childhood Favorite!

Web Summary : Relive childhood memories with this 5-minute papad dish. Roast papad, crumble it, and mix with onions, tomatoes, and a flavorful tempering of mustard seeds, cumin, curry leaves, and chili powder. Add salt and enjoy immediately for a crunchy, tasty snack.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स