Join us

बँगलोर स्टाईल सॉफ्ट, स्पॉजी रवा इडली घरीच करा; परफेक्ट इडली बनवण्याचं खास सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 13:08 IST

Soft & Spongy Instant Rava idli Recipes for Morning Breakfast :रवा इडली करण्याची झटपट, साेपी कृती.

इडली, डोसा, मेदूवडा, अप्पम हे दक्षिण भारतीय पदार्थ संपूर्ण भारतभरात नाश्त्यासाठी आवडीनं खाल्ले जातात. मोठ्या  शहरांमध्ये प्रत्येक कोपऱ्यावर या पदार्थांचे स्टॉल दिसतात. घरी इडली बनवण्याचा बेत विकेंडच्यावेळी आखला जातो. (Cooking Tips & Hacks) पण जशा इडल्या आपण स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये खातो तशा घरी अजिबात बनत नाहीत. (Instant Rava Idli Recipe)

कधी जास्त कडक होतात तर  कधी आंबट चव येतच नाही. रवा इडली बनवण्यासाठी आंबवण्याची प्रकिया वगळली तरी चालते. झटपट तयार होणारी रवा इडली नाश्त्याला उत्तम पर्याय आहे. बँगलोरस्टाईल रवा इडली बनवण्याची परफेक्ट पद्धत पाहूया. (How to make rava idli)

रवा इडलीचा इतिहास काय?

काही इतिहासकारांच्या मते या इडलीचा शोध इंडोनेशियामध्ये लागला होता. कारण  यिस्ट वाढवून बनवलेल्या बर्‍याच पदार्थांचा तेथे शोध लागला आहे. पण रवा इडलीचा शोध एमटीआर (मावल्ली टिफिन रूम्स) चे संस्थापक यज्ञनारायण मैय्या यांनी लावला होता. ही गोष्ट दुसऱ्या महायुद्धाची आहे. जेव्हा यज्ञनारायण एका कॉफी शॉपमध्ये काम करायचे. त्यावेळी प्रामुख्याने इडली तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळाचा तुटवडा होता. 

तांदळाच्या कमतरतेमुळे यज्ञनारायण यांना इडली बनवण्याच्या नवीन पद्धतीचा विचार करण्यास भाग पाडले. मग वेगवेगळ्या प्रकारच्या तृणधान्यांसह इडली बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांना रवा इडली बनवण्यात यश आले. याचा शोध घेतल्यानंतर त्यांनी एमटीआर रेस्टॉरंटची स्थापना केली.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स