इडली (Idli) हा पदार्थ असा आहे जो नाश्त्याला सर्वांनाच खायला आवडतो. नेहमी डाळ तांदूळाची पांढरी इडली खाण्यापेक्षा तुम्ही पौष्टीक अशी नाचणीची इडली (Ragi Idli) खाऊ शकता. नाचणीची इडली खायला खूपच चवदार, चविष्ट लागते. नाचणीच्या इडलीची सोपी रेसिपी पाहूया. या इडल्या पौष्टीक तसंच चवीला रूचकर लागतात. नाचणी पचायला हलकी असते. यात फायबर, कॅल्शियम, आणि इतर आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. म्हणून नाचणीचा वापर करून तुम्ही मऊसूत इडली बनवू शकता. (How to Make Ragi Idli)
नाचणीच्या इडलीची खास रेसिपी (How To Make Ragi Idli Recipe)
नाचणीचे पीठ-१ कप
रवा -१/२ कप
दही-१/२ कप
पाणी-१ कप
इनो फ्रूट सॉल्ट -१ चमचा
मीठ-१/२ चमचा
तेल किंवा तूप-१ चमचा
कोथिंबीर -बारीक चिरलेली
नाचणीच्या पिठाची इडली कशी करतात? (Easy Steps To Make Ragi Idli)
एका मोठ्या भांड्यात नाचणीचे पीठ, रवा आणि मीठ एकत्र करा. त्यात दही आणि पाणी घालून चांगले एकजीव करा. हे मिश्रण चमच्याने किंवा व्हिस्कने ढवळून घ्या, जेणेकरून त्यात गाठी होणार नाहीत. इडलीच्या पीठासारखे सरसरीत ठेवा. हे मिश्रण १० ते १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा, जेणेकरून रवा थोडा फुलेल.
नंतर इडली पात्रात पाणी घालून ते गरम करायला ठेवा. इडलीच्या प्लेट्सला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्या. आता तयार पिठात इनो किंवा खाण्याचा सोडा घाला. त्यावर एक चमचा पाणी घाला, जेणेकरून ते सक्रिय होईल. मिश्रण हळूवारपणे एकाच दिशेने मिक्स करा. जास्त वेळ मिक्स करू नका, नाहीतर बुडबुडे निघून जातील.
पोट थुलथुलीत दिसतं-डाएट जमतच नाही? रोज १ ग्लास ताक 'या' पद्धतीनं प्या-सपाट होईल पोट
हे पीठ लगेच इडलीच्या साच्यांमध्ये ओता. इडली पात्रामध्ये साचे ठेवून, १० ते १२ मिनिटे मध्यम आचेवर इडल्या वाफवून घ्या. इडली शिजली आहे का हे पाहण्यासाठी, इडलीमध्ये सुरी किंवा टूथपिक घालून बघा. जर ती स्वच्छ बाहेर आली,तर इडली तयार आहे. इडल्या पात्रातून काढून थोड्या थंड होऊ द्या. मग चमचा किंवा सुरीच्या मदतीने त्या बाहेर काढा.