मऊ, जाळीदार ढोकळा खायला सर्वांनाच आवडतो हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. घरी केलेला ढोकळा फुलत नाही, बिघडतो अशी अनेकांची तक्रार असते. ढोकळा करण्यासाठी तुम्ही काही खास ट्रिक्स फॉलो करू शकता. ज्यामुळे तुम्ही घरच्याघरी केलेला ढोकळा टेस्टी आणि पौष्टीक होईल. (Soft, Fresh Khaman Dhokla Making Recipe)
सगळ्यात आधी एका भांड्यात चिमूटभर हळद, १ चमचा साखर आणि ३ ते ४ चमचे पाणी घेऊन चमच्यानं व्यवस्थित ढवळून घ्या. बेसन, मिरचीची पेस्ट घाला, पाणी घालून चमच्यानं व्यवस्थित ढवळून घ्या. त्यात बेकिंग सोडा किंवा इनो घालून चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर हे मिश्रण एका ट्रे मध्ये घालून व्यवस्थित वाफवून घ्या. (How To Make Khaman Dhokla At Home)
ढोकळा तयार झाला आहे की नाही ते पाहण्यासाठी त्यात सुरी किंवा टूथ पिक घालून पाहा. टूथ पिकला काहीही चिकटले नाही तर ढोकळा व्यवस्थित तयार झाला आहे. जर टुथपिकला ढोकळा चिकटला तर अजून ५ मिनिटं शिजवून घ्या. तयार ढोकळ्यावर फोडणीचं मिश्रण घाला. गरमागरम ढोकळा तुम्ही चटणीसोबत सर्व्ह करू शकता.
ढोकळ्यासाठी चटणी कशी करतात?
एका मिक्सरच्या भांड्यात कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, पुदीना, शेंगदाणे, मीठ, गूळ आणि पाणी हे पदार्थ घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. बारीक पेस्ट तयार झाल्यानंतर हे मिश्रण वाटीत काढून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मिश्रण कमी- जास्त करू शकता. तसंच यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
ढोकळा परफेक्ट होण्यासाठी टिप्स
१) ढोकळ्यासाठी नेहमी बारीक दळलेले बेसन वापरा. बेसन चाळून घेतल्यास त्यात गुठळ्या होत नाहीत आणि हवा खेळती राहिल्यामुळे ढोकळा छान फुलतो.
२) पिठात थोडे आंबट दही किंवा ताक घातल्याने आंबवण प्रक्रिया चांगली होते आणि ढोकळ्याला छान जाळी पडते.
३) पिठाचे मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावे. पीठ एकाच दिशेने किमान ५ ते ७ मिनिटे फेटावे. यामुळे त्यात हवा भरली जाते आणि ढोकळा हलका होतो.
Web Summary : Make soft, porous Khaman Dhokla at home using simple tricks. Mix ingredients, steam, and check with a toothpick. Temper and serve with chutney. Use fine besan, whisk well for a perfect result.
Web Summary : आसान तरकीबों से घर पर नरम, जालीदार खमन ढोकला बनाएं। सामग्री मिलाएं, भाप दें और टूथपिक से जांच लें। तड़का लगाएं और चटनी के साथ परोसें। बेहतरीन परिणाम के लिए बारीक बेसन का उपयोग करें।