सकाळच्या वेळी नाश्त्याला काहीतरी हलकं, पौष्टिक आणि झटपट होणारं हवं असेल तर ढोकळा हा नेहमीच पहिला पर्याय असतो.(Morning Breakfast Idea) पण नेहमीचा बेसनाचा ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल किंवा तो पचायला जड जात असेल, तर तांदळाचा ढोकळा उत्तम पर्याय आहे. पांढराशुभ्र, कापसासारखा मऊ आणि जाळीदार ढोकळा बघताच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल.(Rice Dhokla recipe) विशेष म्हणजे, हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला ना बेसन लागणार आहे, ना तासनतास डाळ भिजत घालण्याची कटकट.
अनेकांची तक्रार असते की घरचा तांदळाचा ढोकळा हॉटेलसारखा मऊ होत नाही किंवा त्याला जाळी पडत नाही. पण एक 'खास ट्रिक' लक्षात ठेवल्यास आपला ढोकळा मऊसूत आणि थंड झाल्यावरही कोरडा पडणार नाही.(Soft and spongy Rice Dhokla recipe) अगदी कमी तेलात आणि वाफेवर शिजवलेला हा नाश्ता आरोग्यासाठीही तितकाच फायदेशीर आहे. अगदी मुलांच्या डब्यापासून ते पाहुण्याचा पाहुणचार करण्यासाठी ही रेसिपी कशी करायची पाहूया, जाणून घेऊया या परफेक्ट इन्स्टंट तांदूळ ढोकळ्याची पद्धत.(Best tips for soft dhokla at home)
सुपरफूड नाश्ता करा वजन आपोआप होईल कमी, पाहा शेवग्याच्या पानांचं धिरडं-पोटभर पौष्टिक पदार्थ
साहित्य
तांदूळ- १ कप (स्वच्छ धुवून किमान २-३ तास भिजवलेले)
रवा - १/४ कप (ढोकळ्याला छान टेक्सचर देण्यासाठी)
दही- १ कप (आंबट असल्यास अधिक चांगले)
मीठ- चवीनुसार
साखर-१ चमचा
जिरे- १ चमचा
आलं-हिरवी मिरची पेस्ट- २ चमचे
तेल- २ चमचे
मोहरी - १ चमचा
बारीक चिरलेली मिरची - १
इनो किंवा खाण्याचा सोडा- १/४ टीस्पून
कढीपत्ता- ७-८ पाने
ताजी कोथिंबीर- मूठभर (बारीक चिरलेली)
कृती
1. सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून २ ते ३ तास भिजत घाला. यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ, रवा आणि दही घालून त्याचे बॅटर तयार करा.
2. तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून त्यात साखर, जिरे, मीठ, आलं-हिरवी मिरची पेस्ट आणि चमचाभर तेल घालून सर्व साहित्य एकजीव करा.
3. आता टीनमध्ये बटर पेपर लावून घ्या. बॅटरमध्ये इनो आणि त्यावर थोडे तेल घालून मिक्स करा. तयार टीनमध्ये ढोकळ्याचे बॅटर घाला. कढईमध्ये पाणी गरम करुन त्यात जाळी ठेवा. या जाळीवर हा टीन ठेवून १५ ते २० मिनिटे झाकूण ठेवा. वाफेवर ढोकळा व्यवस्थित शिजेल.
4. ढोकळा थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे करा. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, मिरची आणि कढीपत्ता घाला. वरुन ढोकळ्याचे तुकडे घाला. व्यवस्थित परतवून घ्या. चटणीसोबत खा तांदळाचा मऊसुत ढोकळा.
