Join us

अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितली मुगडाळ खिचडी करण्याची हटके रेसिपी- बघा तिचा व्हायरल व्हिडिओ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2024 09:10 IST

Most Simple Recipe Of Khichadi: मुगाच्या डाळीची खिचडी आपण नेहमीच करतो. आता अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय त्या पद्धतीने खिचडी करून  पाहा. (Khichadi recipe shared by actress Bhagyashree)

ठळक मुद्देखिचडी करण्यासाठी भाग्यश्रीने खूपच मोजके पदार्थ वापरले आहेत. कधीतरी भाग्यश्रीने सांगितलेल्या रेसिपीनुसार खिचडी करून पाहायला हरकत नाही. 

अभिनेत्री भाग्यश्री सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. ती तिचे स्वत:चे वैयक्तिक फोटो, व्हिडिओ तर सोशल मिडियावर शेअर करतेच. पण त्यासोबतच आठवड्यातून एक दिवस ती तिच्या चाहत्यांना फिटनेस मोटीव्हेशन देत असते. कधी ती एखादा व्यायाम सांगते तर कधी एखाद्या व्हिडिओतून आहाराबाबत माहिती देते. आता तिने तिचा एक व्हिडिओ नुकताच पोस्ट केला असून यामध्ये तिने मुगाच्या डाळीची खिचडी कशी करायची (How to make moong dal khichadi), याची तिची खास रेसिपी शेअर केली आहे (Khichadi recipe shared by actress Bhagyashree). त्यासोबतच मुगाच्या डाळीची खिचडी खाण्याचे फायदेही तिने सांगितले आहेत. (Simplest recipe of khichadi)

 

खिचडी करण्याची अभिनेत्री भाग्यश्रीची खास रेसिपी

सगळ्याच घरांमध्ये खिचडी नेहमीच होते. ज्यांना स्वयंपाकात फार रस नसतो, त्या पुरुषांनाही स्वयंपाकातला येणारा सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे खिचडी. आता अभिनेत्री भाग्यश्रीच्या स्टाईलने खिचडी करून पाहा.

६ पदार्थ नियमितपणे खा, कोलेस्ट्रॉल नेहमीच राहील कंट्रोलमध्ये

खिचडी करण्यासाठी भाग्यश्रीने खूपच मोजके पदार्थ वापरले आहेत. सगळ्यात आधी तर तिने डाळ- तांदूळ धुवून घेतले. खिचडीसाठी तिने खास हिरव्या सालीची मुगाची डाळ वापरली आहे. डाळ- तांदूळ धुतल्यानंतर तिने ते थेट कुकरमध्ये टाकले.

१ कप तांदळासाठी अर्धा कप मुग डाळ आणि ३ कप पाणी टाकले. त्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि १ चमचा तूप टाकले आणि कुकर गॅसवर ठेवले. 

 

पहिल्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस मंद करा आणि आणखी १ शिट्टी होऊ द्या, असंही तिने सांगितलं.

कोणताही मसाला न टाकता भाग्यश्रीने केलेली ही खिचडी आजारी व्यक्तींसह घरातल्या लहान बाळांना द्यायलाही चांगली आहे.

Rose Day: प्रेमानं गुलाब देताना गुलाबाच्या पाकळ्यांचे हे पदार्थही खा, वाढेल प्रेमाची गुलाबी रंगत!

हिरव्या सालीची मुगाची डाळ साध्या डाळीपेक्षा अधिक पौष्टिक असते. कारण त्यातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटिन, फायबर मिळतात. 

कधीतरी भाग्यश्रीने सांगितलेल्या रेसिपीनुसार खिचडी करून पाहायला हरकत नाही. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीभाग्यश्री