Lokmat Sakhi >Food > उरलेल्या भातापासून तुम्हीही 'फोडणीचा भात' बनवता? आरोग्यावर होतात 'हे' वाईट परिणाम

उरलेल्या भातापासून तुम्हीही 'फोडणीचा भात' बनवता? आरोग्यावर होतात 'हे' वाईट परिणाम

बहुतेक लोक रात्री उरलेला भात सकाळी फोडणीचा भात करून खातात. सर्वांना फोडणीचा भात खूप आवडतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:54 IST2025-01-25T17:53:56+5:302025-01-25T17:54:34+5:30

बहुतेक लोक रात्री उरलेला भात सकाळी फोडणीचा भात करून खातात. सर्वांना फोडणीचा भात खूप आवडतो.

side effects of reheating rice can weak your digestive system by expert advice | उरलेल्या भातापासून तुम्हीही 'फोडणीचा भात' बनवता? आरोग्यावर होतात 'हे' वाईट परिणाम

उरलेल्या भातापासून तुम्हीही 'फोडणीचा भात' बनवता? आरोग्यावर होतात 'हे' वाईट परिणाम

भात पुन्हा गरम करावा की नाही? याबद्दल बरेच वादविवाद आहेत. बहुतेक लोक रात्री उरलेला भात सकाळी फोडणीचा भात करून खातात. सर्वांना फोडणीचा भात खूप आवडतो. मात्र भात पुन्हा गरम केल्याने किंवा शिजवल्याने आरोग्यावर काही वाईट परिणाम होतो असं म्हणतात. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट अँड डायटीशियन शिखा शर्मा अग्रवाल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

भात पुन्हा गरम करावा की नाही?

तज्ज्ञांच्या मते, भात पुन्हा गरम केल्यानंतर खाऊ नये. हे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतं. भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होऊ शकतं. कारण भात थंड झाल्यावर त्यात बेसलस सेरेस बॅक्टेरिया वाढू लागतात. भात पुन्हा गरम केल्यावर हे बॅक्टेरिया नष्ट होतात परंतु त्यांचे घटक भातात पूर्णपणे मिसळतात, जे विषारी असू शकतात. विषारी घटक शरीरात गेल्यावर फूड पॉयझनिंग होऊ शकतं.

पचन

भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने भातातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. पोषक तत्वांशिवाय शरीराला भात पचवण्यास त्रास होतो. ज्यामुळे पोटाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या देखील असू शकते. जर तुम्ही पुन्हा गरम केलेला भात खात असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.

गॅसची समस्या

पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने गॅसची समस्या उद्भवू शकते. दीर्घकालीन गॅसच्या समस्येचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. गॅसमुळे शरीराच्या नसांवर दाब वाढतो.

'या' गोष्टी ठेवा लक्षात 

- भात तयार केल्यानंतर २ तासांच्या आत खाल्ला पाहिजे.

- भात पुन्हा गरम करून कधीही खाऊ नये.

- थायरॉईडच्या रुग्णांनी पुन्हा गरम केलेला भात खाऊ नये.

- रात्रीचं शिळं अन्न, भात शक्यतो खाणं टाळा. 
 

Web Title: side effects of reheating rice can weak your digestive system by expert advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.