Join us

कांदे-बटाटे एकाच टोपलीत ठेवणं पडतं महागात, लवकर सडतात आणि पोटही बिघडू शकतं कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:59 IST

Kitchen Tips : बहुतेक लोकांच्या घरात एकच समस्या नेहमी दिसते, ती म्हणजे बटाटे आणि कांदे एकत्र ठेवणे. जर तुम्हीही हे करत असाल, तर आजपासूनच ही सवय सोडा.

Kitchen Tips : भारतीय स्वयंपाकघरात काहीही असो वा नसो, बटाटे आणि कांदे नक्की असतात. या दोन भाज्या जवळपास प्रत्येक पदार्थात वापरल्या जातात. पण बहुतेक लोकांच्या घरात एकच समस्या नेहमी दिसते, ती म्हणजे बटाटे आणि कांदे एकत्र ठेवणे. जर तुम्हीही हे करत असाल, तर आजपासूनच ही सवय सोडा, कारण या दोन्ही भाज्या एकत्र ठेवल्याने त्या लवकर खराब होतात आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्याने काय होतं?

तज्ज्ञांच्या मते, बटाटा आणि कांदा कधीच एकत्र ठेवू नयेत, कारण दोन्हीही आर्द्रता आणि गॅस यांच्याशी संवेदनशील असतात. बटाट्यातून निघणारा ओलावा कांदा खराब करते. आणि कांद्यामधून निघणारा इथिलीन गॅस बटाट्याला कोंब आणतो. यामुळे दोघांची ताजेपणा आणि गुणवत्ता कमी होते.

बटाटे आणि कांदे एकत्र ठेवण्याचे तोटे

बटाटे लवकर अंकुरीत होतात. कांद्यामधील इथिलीन गॅसमुळे बटाट्यांना कोंब येऊ लागतात. यामुळे बटाट्यात सोलनिन आणि चाकोनिन नावाचे विषारी घटक तयार होतात, जे आरोग्यास हानिकारक असतात. बटाट्यातील आर्द्रतेमुळे कांदे कुजतात आणि दुर्गंधी निर्माण होते. परिणामी दोन्ही भाज्या लवकर खराब होतात आणि खाण्यालायक राहत नाहीत.

बटाटे आणि कांदे योग्य प्रकारे कसे साठवावे?

दोन्ही वेगळ्या ठिकाणी ठेवा. हवेशीर, थंड आणि कोरड्या जागेत. फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण थंडीत त्यांची टेस्ट बदलते. कांदे जाळीदार टोपलीत किंवा कपड्याच्या पिशवीत ठेवा, ज्यामुळे हवा खेळती राहते. बटाटे अंधाऱ्या आणि कोरड्या ठिकाणी ठेवा, थेट प्रकाशापासून दूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't Store Potatoes and Onions Together; It's Costly!

Web Summary : Storing potatoes and onions together spoils them quickly. Potatoes sprout due to onion's gas, while onions rot from potato's moisture. Keep them separate in cool, dry, ventilated spots for freshness.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सकिचन टिप्स