Lokmat Sakhi >Food > श्रावण स्पेशल : मालपुवा करण्याची पारंपरिक पण पौष्टिक रेसिपी, करा गव्हाच्या पिठाचा मालपुवा

श्रावण स्पेशल : मालपुवा करण्याची पारंपरिक पण पौष्टिक रेसिपी, करा गव्हाच्या पिठाचा मालपुवा

Shravan Special: Traditional yet nutritious recipe for making Malpuva, make Malpuva with wheat flour, healthy and easy recipes :मालपुवा करण्याचे अनेक प्रकार असतात. त्यापैकी एक खास कणकेचा मालपुवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2025 16:11 IST2025-08-20T16:10:53+5:302025-08-20T16:11:43+5:30

Shravan Special: Traditional yet nutritious recipe for making Malpuva, make Malpuva with wheat flour, healthy and easy recipes :मालपुवा करण्याचे अनेक प्रकार असतात. त्यापैकी एक खास कणकेचा मालपुवा.

Shravan Special: Traditional yet nutritious recipe for making Malpuva, make Malpuva with wheat flour, healthy and easy recipes | श्रावण स्पेशल : मालपुवा करण्याची पारंपरिक पण पौष्टिक रेसिपी, करा गव्हाच्या पिठाचा मालपुवा

श्रावण स्पेशल : मालपुवा करण्याची पारंपरिक पण पौष्टिक रेसिपी, करा गव्हाच्या पिठाचा मालपुवा

स्नेहा अमित शर्मा (नाशिक)

मालपुवा ही राजस्थानी मिठाई आहे. विशेष करून मालपुवा हा राजस्थान ,गुजरात ,मध्य प्रदेश या भागांमध्ये जास्त बनविला जातो. श्रावण महिन्यात मारवाडी बांधवांच्या घरी रक्षाबंधन, तीज, जन्माष्टमी हे मोठे सण असतात. मारवाडी लोक खास करून या सणासाठी मालपुवा, घेवर, सत्तूचे लाडू तयार करतात. तसेच मालपुवाचे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे घटक वापरून बनवले जातात. (Shravan Special: Traditional yet nutritious recipe for making Malpuva, make Malpuva with wheat flour, healthy and easy recipes )आज आपण पाहूया मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे हेल्दी असे मालपुवा करण्याची खास रेसिपी.

गव्हाच्या पिठाचा मालपुवा

वेळ-४५ मिनिटं
दिलेल्या साहित्यात १० ते १२ मालपुवे होतात.

साहित्य--
१. 1 मोठा ग्लास दूध
२. तळण्यासाठी शुद्ध तूप
३. १/४ कप दूधाची साय
४. 1.5 कप साखर
५. आवश्यकतेनुसार पाणी
६. सजावटीसाठी केशर ड्रायफ्रूट ऑप्शनल
७. १ वाटी गव्हाचे पीठ
८. २ टीस्पून रवा

कृती 
१. प्रथम एका पातेल्यामध्ये वरील प्रमाणे गव्हाचे पीठ, रवा,दुधाची साय घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध टाका, मिश्रण हे जास्त पातळ व जास्त घट्ट व्हायला नको. मिश्रण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा.
२. त्यानंतर एका पातेल्यामध्ये साखर टाका, त्यामध्ये साखर बुडेल इतके पाणी टाकून पाक तयार करून घ्या. पाक आपल्याला एकतारी बनवायचा नाही,थोडासा चिकटपणा आला की पाक बंद करा.
३. एका कढईमध्ये शुद्ध तूप व्यवस्थित गरम करून घ्या. गॅसचा फ्लेम मध्यम राहू द्या. गोल आकाराच्या चमच्याच्या साह्याने थोडेसे मिश्रण गरम तुपात टाका. त्या मालपुवा यांना गोल पुरीसारखा आकार येईल. ते दोन्ही बाजूने सोनेरी रंग येऊ पर्यंत खरपूस तळून घ्या.
४. गरम खरपूस मालपुवे कोमट पाकात टाका. दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाकात ठेवू नका. नाहीतर मालपुवे नरम पडतील. मालपुवे गरमागरम खा. हवे असल्यास याला ड्रायफ्रुट व केशर टाकून डेकोरेट करा.

Web Title: Shravan Special: Traditional yet nutritious recipe for making Malpuva, make Malpuva with wheat flour, healthy and easy recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.