Join us

श्रावणातल्या रिमझिम पावसात गरमागरम गुलगुले खाण्याची मजाच वेगळी! लाल भोपळ्याची पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 18:05 IST

Shravan Special Recipe: लाल भोपळ्याचे गुलगुले...तुम्ही सुद्धा कधीतरी चाखून पाहा..

ठळक मुद्देश्रावणातल्या रिमझिम पावसात गरमागरम गुलगुले खाण्याची मजाच वेगळी. तुम्ही सुद्धा कधीतरी ती चाखून पाहा..

-सुनंदा डोंगरे (चेडगे), अकोलापुर्वी लहान मुलांसाठी श्रावणाचा आनंद म्हणजे दर श्रावणी सोमवारी शाळेतून लवकर घरी जायला मिळत असे. आमच्या अकोल्याचे आराध्य दैवत राज राजेश्वर. तिथली यात्रा, यात्रेतल्या वेगवेगळ्या खेळणी आणि खाण्याचे वेगवेगळे पदार्थ यांची मजाच वेगळी. त्यामुळेच तर लहानपण आणि श्रावण यांची एक वेगळीच आठवण आहे. श्रावणातल्या सोमवारी आई खाण्याचे वेगवेग‌ळे पदार्थ करायची. पण श्रावण असो, गणपती असो, महालक्ष्मी असो एक फळभाजी हमखास डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे 'कवड'. यालाच कुणी लाल भोपळा, गंगाफळ, काशी फळ असंही म्हणतात. त्याच लाल भोपळ्याचे गुलगुले आई दर सोमवारी करायची. कधी त्याची खीरसुद्धा असायची. पण माझा खास आवडता पदार्थ म्हणजे गुलगुले. आमच्याकडे त्याचाच नैवेद्य शंकाराला दाखविण्याची परंपरा आहे. मी सुद्धा आता हा पदार्थ केला की मुलं आवडीने खातात. श्रावणातल्या रिमझिम पावसात गरमागरम गुलगुले खाण्याची मजाच वेगळी. तुम्ही सुद्धा कधीतरी ती चाखून पाहा..

 

लाल भोपळ्याचे गुलगुले करण्याची रेसिपी

साहित्य

१ वाटी लाल भोपळ्याच्या फोडी

पावसाळ्यात 'या' रोपांची कटिंग करायलाच हवी! काही दिवसांतच भराभर वाढून खूप फुलून येतील

१ वाटी गव्हाचे पीठ

चवीनुसार मीठ

पाऊण वाटी गूळ

अर्धा चमचा वेलची पावडर

 

कृती

साधारण १ वाटीभर लाल भोपळ्याच्या फोडी घ्या. त्याच्या साली काढून तो उकडून घ्या.

मुंग्यांनाही लावा थोडीशी टाल्कम पावडर! घरातून मुंग्यांना घालवून टाकण्यासाठी भन्नाट देसी जुगाड...

आता उकडलेल्या भोपळ्यामध्ये गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ, गूळ आणि वेलची पूड घालून ते कालवून घ्या. भजी करताना जसं सरबरीत पीठ भिजवता तसंच ते भिजवा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून भजी किंवा वडे तळतो त्याप्रमाणे ते तळून घ्या. गरमागरम गुलगुले तयार.. 

 

 

टॅग्स :श्रावण स्पेशल पदार्थश्रावण स्पेशलअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.