Lokmat Sakhi >Food > Shravan Special Recipe : भाजी कुठलीही असो ‘हे’ दोन चमचे हिरवे वाटण घाला, भाजी होते चविष्ट आणि चमचमीत

Shravan Special Recipe : भाजी कुठलीही असो ‘हे’ दोन चमचे हिरवे वाटण घाला, भाजी होते चविष्ट आणि चमचमीत

Shravan Special Recipe: add two teaspoons of this green Vatan, masala that can make any vegetable tasty, easy recipe : श्रावणात करा हे खास वाटण. सोपी रेसिपी . कांदा लसूण न घालता करा भाजी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2025 18:06 IST2025-07-25T18:05:19+5:302025-07-25T18:06:23+5:30

Shravan Special Recipe: add two teaspoons of this green Vatan, masala that can make any vegetable tasty, easy recipe : श्रावणात करा हे खास वाटण. सोपी रेसिपी . कांदा लसूण न घालता करा भाजी.

Shravan Special Recipe: add two teaspoons of this green Vatan, masala that can make any vegetable tasty, easy recipe | Shravan Special Recipe : भाजी कुठलीही असो ‘हे’ दोन चमचे हिरवे वाटण घाला, भाजी होते चविष्ट आणि चमचमीत

Shravan Special Recipe : भाजी कुठलीही असो ‘हे’ दोन चमचे हिरवे वाटण घाला, भाजी होते चविष्ट आणि चमचमीत

श्रावणासाठी खास रेसिपी. भाजीत कांदा लसूण न घालताही छान वाटणाची चविष्ट भाजी करता येते. त्यासाठी हे वाटण नक्की करुन पाहा. (Shravan Special Recipe:  add two teaspoons of this green Vatan, masala that can make any vegetable tasty, easy recipe )कांद्याचे लाल वाटण जसे छान लागते तसेच हे हिरवे वाटणही एकदम मस्त असते. एकदा केले की दोन ते तीन दिवस खराब होत नाही. फ्रिजमध्ये ठेवायचे हा एकच नियम. कोणत्याही भाजीत घालू शकता. चवीला मस्तच लागते. भाजी नसले तर नुसते वाटण परतून खायलाही मस्त लागते.   

साहित्य 
नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, तेल, काजू, धणे पूड, जिरे पूड, मीठ, शेंगदाणे, पाणी, लिंबू, गरम मसाला  

कृती
१. ताजा छान नारळ फोडून घ्यायचा.नारळ फोडून झाल्यावर मस्त खवून घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. तसेच ताजी कोथिंबीर निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवायची. धुतल्यावर बारीक चिरायची. कोथिंबीर चांगली भरपूर वापरायची. काजू भिजत घालायचे. तसेच शेंगदाणेही भिजत ठेवायचे. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात खवलेला नारळ घ्यायचा. मग त्यात कोथिंबीर घालायची. तसेच आल्याचा लहान तुकडा घालायचा. कोथिंबीर चिरलेली नसेल तर नीट वाटली जात नाही, म्हणून चिरुनच घ्यायची. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि भिजवलेले काजू घालायचे. तसेच भिजवलेले शेंगदाणे घालायचे आणि मग त्यात गरम मसाला घालायचा.

३. चमचाभर धणे पूड घालायची आणि चमचाभर जिरे पूडही घालायची. थोडा लिंबाचा रस पिळायचा. सगळे पदार्थ एकत्र केल्यावर त्यात थोडे पाणी घालायचे आणि वाटण वाटून घ्यायचे. छान एकजीव वाटण करायचे. वाटणातील सगळे पदार्थ छान वाटले गेले की त्यात थोडे मीठ घालायचे. तसेच हळद घालायची आणि मिक्स करायचे. पातळ वाटण करायचे नाही. जरा घट्टच ठेवायचे. 

४. भाजी करताना कढईत तेल गरम करायचे. त्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करायची. फोडणी तडतडल्यावर त्यात तयार केलेल्या वाटणाचे दोन चमचे घालायचे. वाटण छान परतायचे. परतून खमंग झाल्यावर त्यात जी भाजी करायची आहे ती घालायची. झाकण ठेवायचे आणि भाजी शिजवून घ्यायची. मस्त चविष्ट लागते. आवडीचे मसाले आणि इतर पदार्थही घालू शकता. 
   

Web Title: Shravan Special Recipe: add two teaspoons of this green Vatan, masala that can make any vegetable tasty, easy recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.