आमटी करताना त्यात मस्त बारीक चिरलेला कांद्या घातल्यावर आमटीची चव एकदम मस्त लागते. लसणाची फोडणी दिल्यावर आमटीची चवच बदलून जाते. भातावर घ्यायची आमटी चविष्ट नसेल तर जेवणातील मजाच जाते. कांदा लसूण न वापरताही मस्त आमटी करता येते. (Shravan Special food: Make delicious masoor amti without adding onion and garlic! This one ingredient enhances the taste , see special recipe )एकदा ही रेसिपी करुन पाहा. नक्की आवडेल. ताजा नारळ घ्यायचा म्हणजे चव एकदम मस्त लागते. तसेच ही आमटी पोळीसोबतही खाता येते. तुम्हाला आवडेल तशी करा. घट्ट करा किंवा पातळ छानच लागते.
साहित्य मसूर, तेल, पाणी, मोहरी, हिंग, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, जिरं, टोमॅटो, नारळ, हळद, तिखट, मीठ
कृती१. मसूर डाळ एका पातेल्यात घ्या आणि स्वच्छ धुऊन घ्या. दोन ते तीन पाण्यातून काढा आणि मग भिजत घाला. थोडा वेळ भिजली की जरा छान फुलते. भिजवली नाही तरी चालेल. कुकुरमध्ये शिजवायची. मस्त मऊ शिजवायची. दोन शिट्या जास्त काढायच्या.
२. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. निवडायची आणि मग बारीक चिरायची. तसेच टोमॅटो धुवायचे आणि टोमॅटोही चिरुन घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा लहान तुकडा किसून घ्यायचा.ताजा नारळ घ्यायचा. नारळ फोडायचा आणि मग खवायचा. भरपूरसा नारळ घ्यायचा.
३. फोडणीसाठी गॅसवर कढई तापत ठेवायची. त्यात थोडे तेल घालायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात जिरं घाला. जिरं मस्त फुलेल मग त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. किसलेलं आलं घाला, तसेच हिंग घालायचे. मसूर अजिबात बाधणार नाही. हिंग मात्र विसरु नका. नारळ घालायचा. नारळ खमंग परतून घ्यायचा. मग त्यात थोडी हळद घालायची. तसेच थोडे लाल तिखट घालायचे आणि मग चवी पुरते मीठ घालायचे. त्यात कोथिंबीर घालायची. कोथिंबीरही परतून घ्यायची.
४. त्यात टोमॅटो घालायचे. टोमॅटो परतून घ्यायचा. खमंग वास येतो. मग त्यात शिजवलेली मसूर डाळ घालायची. फोडणी आणि डाळ एकजीव करायची. त्यासाठी आमटी मस्त ढवळायची. एक उकळी काढायची. त्यात पाणी घालायचे. मस्त घट्ट आमटी केली तर पोळीसोबतही मस्त लागते. गरमागरम आमटी प्यायलाही छान लागेल.