Lokmat Sakhi >Food > साबुदाणा न वापरात फक्त १० मिनिटांत कुकरमध्ये करा उपवासाची खीर-पौष्टिक आणि पचायलाही हलकी...

साबुदाणा न वापरात फक्त १० मिनिटांत कुकरमध्ये करा उपवासाची खीर-पौष्टिक आणि पचायलाही हलकी...

Shravan fasting kheer recipe : Upvas special kheer : Fasting kheer without sabudana : Upvasachi Varai Bhagar Kheer : Varai Bhagar kheer recipe : उपवासासाठी वरई आणि राजगिरा यांची स्वादिष्ट, पचायला सोपी आणि पोषक खीर उत्तम पर्याय ठरतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 15:07 IST2025-07-29T14:42:26+5:302025-07-29T15:07:08+5:30

Shravan fasting kheer recipe : Upvas special kheer : Fasting kheer without sabudana : Upvasachi Varai Bhagar Kheer : Varai Bhagar kheer recipe : उपवासासाठी वरई आणि राजगिरा यांची स्वादिष्ट, पचायला सोपी आणि पोषक खीर उत्तम पर्याय ठरतो.

Shravan fasting kheer recipe Upvas special kheer Fasting kheer without sabudana Upvasachi Varai Bhagar Kheer Varai Bhagar kheer recipe | साबुदाणा न वापरात फक्त १० मिनिटांत कुकरमध्ये करा उपवासाची खीर-पौष्टिक आणि पचायलाही हलकी...

साबुदाणा न वापरात फक्त १० मिनिटांत कुकरमध्ये करा उपवासाची खीर-पौष्टिक आणि पचायलाही हलकी...

श्रावण महिन्यांत येणाऱ्या सणावाराला व्रत-वैकल्ये, पूजापाठ आणि उपवास हमखास केले जातात. श्रावणात आपल्यापैकी अनेकजण उपवास करतात आणि उपवासाच्या दिवशी (Shravan fasting kheer recipe) साबुदाणा - बटाट्याचे पदार्थ खाण्यावर अधिक भर देतात. साबुदाणा खिचडी किंवा वडा हे पारंपरिक (Upvas special kheer) पदार्थ सगळेच आवडीने खातात. पण अनेकदा प्रत्येक उपवासाला साबुदाणा खाल्ल्याने एकच चव लागते आणि काहींना तो पचायला देखील ( Fasting kheer without sabudana) जड वाटतो. अशावेळी, उपवासाला काहीतरी नवीन, पौष्टिक आणि (Upvasachi Varai Bhagar Kheer) चविष्ट खाण्याची इच्छा होते. यासाठीच, यंदाच्या श्रावण महिन्यांतील उपवासाला आपण नेहमीच्या साबुदाण्याला पर्याय म्हणून वरई आणि राजगिऱ्याची पौष्टिक अशी खीर तयार करु शकतो(Varai Bhagar kheer recipe).

ही खीर फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. वरई आणि राजगिरा हे दोन्ही उपवासासाठी उत्तम मानले जातात आणि त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. वारंवार उपवासाला साबुदाणा खाणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही, कारण त्यात पोषणमूल्य कमी आणि स्टार्च जास्त प्रमाणात असतो. उपवासासाठी काही हेल्दी पदार्थ करायचा म्हटलं तर, वरई आणि राजगिरा यांची स्वादिष्ट, पचायला सोपी आणि पोषक खीर उत्तम पर्याय ठरतो. उपवासासाठी साबुदाणा न वापरता पौष्टिक खीर करण्याची सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. राजगिरा - १/४ कप 
२. वरई - १/४ कप 
३. साजूक तूप - २ टेबलस्पून 
४. गरम पाणी - १ + १/२ कप 
५. दूध - २ कप 
६. साखर - १/३ कप 
७. ड्रायफ्रूट काप - १/२ कप 
८. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
९. केशर - ७ ते ८ काड्या 

अळूची भाजी-वडी खाल्ली की घशात खवखव? ७ टिप्स- श्रावणात भरपूर खा अळूचे पदार्थ...


तेल तूप एक थेंबही न घालता करा मऊमोकळी साबुदाणा खिचडी! उपवास करा मजेत, खा निवांत...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये वरई आणि राजगिरा दोन्ही एकत्रित घेऊन पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावे. 
२. मग यातील पाणी संपूर्णपणे गाळणीच्या मदतीने निथळून घ्यावे. 
३. कुकरमध्ये चमचाभर साजूक तूप घेऊन त्यात धुतलेली वरई आणि राजगिरा दोन्ही एकत्रित घालून हलकेच खमंग असे खरपूस भाजून घ्यावे. 
४. मग यात थोडे गरम पाणी ओतून कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या काढून घ्याव्यात. 

श्रावण स्पेशल : साबुदाण्याची रसमलाई! उपवासाला करा गोडाधोडाचा नवीन पदार्थ, करायलाही सोपा...

५. कुकरच्या ३ शिट्ट्यांमध्ये वरई आणि राजगिरा दोन्ही व्यवस्थित शिजून तयार असेल या मिश्रणात दूध, साखर, वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे काप, केशर काड्या घालाव्यात. 
६. त्यानंतर पुन्हा कुकरचे झाकण लावून फक्त ५ मिनिटे हलकीशी एक उकळी काढून घ्यावी. 

प्रेशर कुकरमध्ये अगदी १० ते १५ मिनिटांत उपवासाची साबुदाणा न वापरता, वरई - राजगिऱ्याची पौष्टिक अशी खीर खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Shravan fasting kheer recipe Upvas special kheer Fasting kheer without sabudana Upvasachi Varai Bhagar Kheer Varai Bhagar kheer recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.