Coconut Water Drinking Tips : सगळ्यात फायदेशीर नॅचरल ड्रिंक म्हटलं तर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर थेट नारळपाणी येतं. भरपूर लोक रोज न विसरता नारळपाणी पितात. नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. पण खरंच रोज नारळपाणी पिणं फायद्याचं ठरतं का? हेही माहीत असणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही गोष्टीची अति ही नुकसानकारक ठरत असते. अशात पाहुयात की रोज नारळपाणी प्यावं की नाही किंवा ते आठवड्यातून किती वेळा प्यावं?
नारळ पाण्याचे फायदे
नारळपाणी शरीराला अनेक प्रकारे फायदा करतं. हे शरीराला हायड्रेट ठेवतं आणि किडनीची कार्यक्षमता सुधारतं. मात्र, यात पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास आरोग्याचं नुकसानही होऊ शकतं. मॅरिंगो एशिया हॉस्पिटल्स, फरीदाबाद येथील डायटेटिक्स विभाग प्रमुख डॉ. नीति शर्मा यांनी एका वेबसाइटला याबाबत माहिती दिली.
नारळ पाण्यातील पोषक तत्व
नारळपाण्यामध्ये प्रोटीन, गुड फॅट, कार्बोहायड्रेट्स, फायबर, आयर्न, व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि फॅटी अॅसिडचं प्रमाण भरपूर असतं. याच्या सेवनाने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
किती नारळपाणी पिणं योग्य आहे?
योग्य प्रमाणात घेतलेली कोणतीही गोष्ट शरीरासाठी फायदेशीर ठरते, पण अति नेहमीच नुकसानकारक असते. नारळ पाण्याच्याही बाबतीत हेच लागू होतं. बहुतेक लोकांसाठी एका वेळेस सुमारे 150 ते 200 मिलीलीटर नारळपाणी पुरेसं असतं. एका मध्यम आकाराच्या नारळात एवढं पाणी सहज मिळतं. त्यामुळे मोठ्या आकाराचा नारळ म्हणजे जास्त फायदा असं समजू नका.
आठवड्यात चार वेळा नारळपाणी प्यायल्यास काय होईल?
आठवड्यात ३ ते ४ वेळा नारळपाणी पिणं बहुतेक लोकांसाठी योग्य आहे. जर तुम्ही अत्यंत सक्रिय असाल, तुम्हाला खूप घाम येत असेल किंवा एखाद्या आजारातून सावरत असाल, तर नारळपाणी शरीरातील हरवलेले फ्लुइड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स परत आणण्यास मदत करतं. त्यामुळे एका निरोगी व्यक्तीसाठी आठवड्यात चार वेळा नारळपाणी पिणं एक योग्य आणि सुरक्षित प्रमाण मानलं जातं.
नारळपाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
नारळ पाण्याचा संपूर्ण फायदा घ्यायचा असेल, तर ते योग्य वेळी प्यायला हवं. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, नारळ पणी पिण्याची सगळ्यात चांगली वेळ सकाळी किंवा व्यायामानंतरची आहे. हे पोटासाठी हलकं असतं आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं. मात्र, रात्री उशिरा नारळपाणी पिणं टाळा, विशेषतः जर तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागत असेल तर.
कोणासाठी फायदेशीर आणि कुणी काळजी घ्यावी?
नारळपाणी हाय ब्लड प्रेशर, डिहायड्रेशन आणि अॅथलीट्ससाठी फायदेशीर आहे. तसेच हे हलकं असल्यामुळे मुलं आणि वृद्धांसाठी देखील एक चांगला पर्याय आहे. परंतु, किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नारळपाणी प्यावं. तसेच डायबिटीज असलेल्या रुग्णांनी ते मर्यादित प्रमाणातच प्यावं.
हिवाळ्यात नारळपाणी कधी पिऊ नये?
सर्दी-खोकला
थंडीच्या दिवसात सकाळी आणि सायंकाळी नारळाचं पाणी प्याल तर सर्दी आणि खोकल्याची समस्या होण्याचा धोका असतो. एक्सपर्ट्स सांगतात की, नारळाचं पाणी थंड असतं, त्यामुळे थंडीच्या दिवसात हे दुपारी प्यावं.
ब्लड प्रेशर
थंडीच्या दिवसात ब्लड प्रेशर जास्त प्रभावित होतं. यादरम्यान नारळाचंपाणी पिऊ नये. नारळाच्या पाण्यात ब्लड प्रेशर डाउन करण्याचे गुण असतात. पण जास्त पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर हाय सुद्धा होऊ शकतं.
लूज मोशन
कोणत्याही गोष्टीची अति केली तर शरीरासाठी नुकसानकारक असते. त्यानुसार जर नारळाचंपाणी जास्त प्याल तर लूज मोशनची समस्या होऊ शकते. शरीरात पाण्याचं प्रमाण वाढलं की असं होतं.
Web Summary : Coconut water hydrates and aids kidney function, but moderation is key. Drink 150-200ml, 3-4 times weekly, preferably mornings or post-workout. Avoid excess in winter, especially with cold, cough, or blood pressure issues.
Web Summary : नारियल पानी हाइड्रेट करता है और किडनी के कार्य को बढ़ाता है, लेकिन संयम महत्वपूर्ण है। 150-200 मिलीलीटर, 3-4 बार साप्ताहिक, अधिमानतः सुबह या कसरत के बाद पिएं। सर्दियों में अधिक मात्रा से बचें, खासकर सर्दी, खांसी या रक्तचाप की समस्याओं के साथ।