Lokmat Sakhi >Food > Shravan Food : राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी करा घरीच, उपवास स्पेशल पौष्टिक खाऊ - महिनाभर टिकेल...

Shravan Food : राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी करा घरीच, उपवास स्पेशल पौष्टिक खाऊ - महिनाभर टिकेल...

Sharavn Upvas Special Rajgira Shengadana Barfi : Fasting Special Rajgira Shengadana Barfi : How To Make Rajgira Shengadana Barfi At Home : Fasting Special Rajgira Shengadana Barfi : श्रावणात उपवासाला गोडाधोडाच्या पदार्थांमध्ये राजगिरा, शेंगदाण्याची बर्फी नक्की करुन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 16:41 IST2025-07-31T16:36:40+5:302025-07-31T16:41:30+5:30

Sharavn Upvas Special Rajgira Shengadana Barfi : Fasting Special Rajgira Shengadana Barfi : How To Make Rajgira Shengadana Barfi At Home : Fasting Special Rajgira Shengadana Barfi : श्रावणात उपवासाला गोडाधोडाच्या पदार्थांमध्ये राजगिरा, शेंगदाण्याची बर्फी नक्की करुन पाहा...

Sharavn Upvas Special Rajgira Shengadana Barfi Fasting Special Rajgira Shengadana Barfi How To Make Rajgira Shengadana Barfi At Home Fasting Special Rajgira Shengadana Barfi | Shravan Food : राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी करा घरीच, उपवास स्पेशल पौष्टिक खाऊ - महिनाभर टिकेल...

Shravan Food : राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी करा घरीच, उपवास स्पेशल पौष्टिक खाऊ - महिनाभर टिकेल...

श्रावण महिन्यांत केले जाणारे उपवास हे इतर दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासांपेक्षा थोडे खासच असतात. श्रावण महिनाच मुळात सणवार, व्रत- वैकल्यांचा महिना असल्याने उपवास (Sharavn Upvas Special Rajgira Shengadana Barfi) करणे ओघाने आलेच. यामुळेच सणवार असताना केल्या जाणाऱ्या उपवासाला (Fasting Special Rajgira Shengadana Barfi) मात्र प्रत्येक घरोघरी गोडाधोडाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. श्रावणात शक्यतो (How To Make Rajgira Shengadana Barfi At Home) सगळ्यांच्याच घरात गोडाच्या पदार्थांची मेजवानीच असते. प्रत्येक घरोघर कोणते ना कोणते नेहमीपेक्षा वेगळे असे गोडाचे पदार्थ मोठ्या हौसेने केले जातात. उपवास म्हटलं की अगदी मोजकेच पदार्थ खाता येतात, या पदार्थांपैकीच दोन मुख्य पदार्थ म्हणजे राजगिरा व शेंगदाणे(Fasting Special Rajgira Shengadana Barfi).

उपवास करायचा असेल तर आपण आधीच जास्तीचे शेंगदाणे व राजगिरा पीठ किंवा इतर उपवासाचे पदार्थ आणून ठेवतो. यातीलच राजगिऱ्याचे पीठ व शेंगदाणे वापरुन पण महिनाभर टिकणारी अशी खुसखुशीत उपवासाची बर्फी तयार करु शकतो. उपवासाच्या दिवशी आपण मोजकेच पदार्थ खातो अशावेळी दोन खाण्याच्या मध्ये छोटी भूक लागली तर पटकन तोंडात टाकता येईल असा हा सोपा उपवासाचा पदार्थ. इतकचं नाही तर, यात सगळ्या पौष्टीक पदार्थांचा वापर केल्याने वडी देखील तितकीच हेल्दी आणि उपवासाच्या दिवशी इन्स्टंट एनर्जी मिळवून देणारा उत्तम पदार्थ ठरतो. उपवासाला खाता येईल अशी उपवासाची पौष्टीक  बर्फी करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.          

साहित्य :- 

१. शेंगदाणे - १ कप 
२. साजूक तूप - १ कप 
३. राजगिऱ्याचे पीठ - १ कप 
४. गूळ - १ कप (बारीक किसून घेतलेला)

Alu Vadi : अळूवडी करताना टाळा ‘या’ चुका, मग अळूवडी कायमच होईल परफेक्ट कुरकुरीत...


Shravan Food : भगरीचा उपमा म्हणजे पचायला हलका आणि पौष्टिक, उपवास केल्याचं सार्थक! पाहा रेसिपी...

कृती :- 

१. एका कढईमध्ये शेंगदाणे घेऊन ते मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावेत. भाजून झालेले शेंगदाणे एका बाऊलमध्ये काढून थोडे गार होऊ द्यावेत. 
२. शेंगदाणे व्यवस्थित गार झाल्यावर ते एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन सालीसकटच थोडी जाडसर अशी भरड करुन घ्यावी.  
३. एका कढईत साजूक तूप गरम करत ठेवून ते संपूर्णपणे वितळल्यावर त्यात राजगिऱ्याचे पीठ घालून ते तुपात खमंग असे भाजून घ्यावे. 

साबुदाणा न वापरता फक्त १० मिनिटांत कुकरमध्ये करा उपवासाची खीर-पौष्टिक आणि पचायलाही हलकी...

तेल तूप एक थेंबही न घालता करा मऊमोकळी साबुदाणा खिचडी! उपवास करा मजेत, खा निवांत...

४. तुपात पीठ खरपूस भाजून घेतल्यानंतर त्यात शेंगदाण्याची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली भरड घालावी, ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर पुन्हा हे मिश्रण एकजीव करून व्यवस्थित परतवून घ्यावे. 
५. मग या मिश्रणात बारीक किसलेला गूळ घालावा. गूळ संपूर्णपणे वितळून मिश्रणात एकजीव होईपर्यंत मिश्रण मंद आचेवर गरम करून घ्यावे. 
६. एका ताटांला थोडेसे तूप लावून ते व्यवस्थित पसरवून ग्रीस करून घ्यावे. त्यानंतर या ताटांत बर्फीचे तयार गरम मिश्रण ओतून ते चमच्याच्या मदतीने हलकेच दाब देत नीट सेट करून घ्यावे. मिश्रण गरम असतानाच सुरीच्या मदतीने वड्या पाडून घ्याव्यात. मग १५ ते २० मिनिटे हे मिश्रण असेच सुकण्यासाठी ठेवून द्यावे. 

महिनाभर टिकणाऱ्या उपवासाच्या खुसखुशीत वड्या खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Sharavn Upvas Special Rajgira Shengadana Barfi Fasting Special Rajgira Shengadana Barfi How To Make Rajgira Shengadana Barfi At Home Fasting Special Rajgira Shengadana Barfi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.