Join us

ना भाज्या उकडण्याची गरज ना मिक्सरची, पाहा वन पॉट पावभाजी करण्याची चमचमीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 09:05 IST

see this amazing recipe for one pot pav bhaji : पावभाजी घरी करतच असाल. एकदा या पद्धतीनेही करुन बघा. नक्की आवडेल.

पावभाजी करायची म्हणजे भरपूर भांडी वापरायला लागतात. (see this amazing recipe for one pot pav bhaji)आता चिंता विसरा, वन पॉट पावभाजी करणे अगदी सोपे आहे. एका कुकरमध्ये करा चमचमीत पावभाजी.

साहित्य  बटर, तेल, जिरे, कांदा, आलं, लसूण, हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, कोथिंबीर, गाजर, मटार, फुलकोबी, सिमला मिरची, बीट, बटाटा, पाणी, पाव, टोमॅटो

कृती  १. सगळ्यात आधी पूर्व तयारी करुन घ्या. त्यासाठी कांदा छान बारीक चिरून घ्या. (see this amazing recipe for one pot pav bhaji)आल्याचा तुकडा व लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात टाका आणि वाटून घ्या. कोथिंबीर छान बारीक चिरा. मटार सोलून घ्या. गाजर छान बारीक चिरून घ्या. सिमला मिरचीही चिरून घ्या. फुलकोबी बारीक चिरून घ्या. बीटाचे तुकडे करुन घ्या. बटाटा बारीक चिरून घ्या किंवा लांब काप करा. टोमॅटो चिरून घ्या. सगळ्या भाज्या चिरून घ्या.

२. एका कुकरमध्ये बटर घाला. बटरवर थोडे तेलही घाला. (see this amazing recipe for one pot pav bhaji)बटर वितळल्यावर त्यामध्ये जिरे घाला. जिरे छान फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा छान परतून घ्या. त्यामध्ये आले-लसणाची पेस्ट घाला. मग त्यामध्ये टोमॅटो घाला. सगळं छान मिक्स करुन घ्या. मग कुकरवर झाकण ठेवा. टोमॅटो छान शिजू द्या. मग त्यामध्ये हळद घाला. लाल तिखट घाला. पावभाजी मसाला घाला. मसाले छान मिक्स करुन घ्या. त्यामध्ये थोडे पाणी घाला. मीठ घाला आणि मग त्यामध्ये इतर भाज्या घाला.

३. सगळ्या भाज्या टाकल्यावर त्यामध्ये पाणी ओता आणि जरा वेळ उकळू द्या. उकळल्यावर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घाला. कुकरचे झाकण लावून घ्या. मस्त चार ते पाच तरी शिट्या काढा. भाज्या व्यवस्थित शिजल्यावरच भाजी मऊ होते.

४. कुकर उघडल्यावर स्मॅशरचा वापर करा आणि भाज्या छान मऊ पातळ करुन घ्या. त्यामध्ये रवीने घुसळले तरी भाजी छान मिक्स होते. थोडावेळ तरी स्मॅशरचा वापर करा. म्हणजे भाजी एकजीव होईल.

५. तव्यावर बटर टाका. त्यावर पावभाजी मसाला घाला आणि मग पाव परतून घ्या. भाजी ताटात घ्या. वरतून कांदा, कोथिंबीर टाका, लिंबू पिळा आणि मस्त आस्वाद घेत खा.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स