Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > दूध नासले तर नासकवणी करा, पाहा नासलेला दुधाचा पारंपरिक पदार्थ - उन्हाळ्यातला गोडवा

दूध नासले तर नासकवणी करा, पाहा नासलेला दुधाचा पारंपरिक पदार्थ - उन्हाळ्यातला गोडवा

See the traditional dish of milk, use spoiled milk in this way : नासलेल्या दूधाची करा चविष्ट नास्कवणी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2026 12:15 IST2026-03-22T12:13:28+5:302026-03-22T12:15:11+5:30

See the traditional dish of milk, use spoiled milk in this way : नासलेल्या दूधाची करा चविष्ट नास्कवणी.

See the traditional dish of milk, use spoiled milk in this way | दूध नासले तर नासकवणी करा, पाहा नासलेला दुधाचा पारंपरिक पदार्थ - उन्हाळ्यातला गोडवा

दूध नासले तर नासकवणी करा, पाहा नासलेला दुधाचा पारंपरिक पदार्थ - उन्हाळ्यातला गोडवा

नसलेल्या दुधाची नास्कवणी हा ग्रामीण भागात प्रचलित असलेला एक पारंपरिक आणि अन्न वाया जाऊ नये म्हणून केला जाणारा पदार्थ आहे. नसलेलं दूध आपण फेकून देतो.  काही जणं पनीर लावतात मात्र त्याचं पनीर अगदी कमी लागतं. शिवाय मेहनत जास्त . पण दूध नसल्यावर त्याचा अगदी चविष्ट कलाकंदसारखा पदार्थ करता येतो. ( See the traditional dish of milk, use spoiled milk in this way ) तुमच्याही आई- आजीने ही नास्कवणी नक्कीच केली असेल. नासलेलं दूध आहे असं वाटणारही नाही. फक्त एकच करायचं की दूध नासल्यावर लगेच नास्कवणी करायची. उशीरा केली तर दूध खराब झालेलं असतं. 

फक्त साखर घालूनही केली जाते. किंवा फक्त गूळ घालूनही केली जाते. फार सोपी रेसिपी असते. दूध उकळवून घ्यायचे त्यात साखर , गूळ घालायचा. मात्र त्याची चव आणखी मस्त करण्यासाठी त्यात इतरही पदार्थ घालता येतात. नारळ, तांदूळ, सुकं खोबरं यांचा वापर केला जातो. नारळ किसून त्यात पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून गाळल्यावर जे दूध मिळतं ते ही वापरतात.

दूध नासलं की त्यात पाणी आणि पांढरे घट्ट कण वेगळे होतात. हेच कण म्हणजे छेना किंवा पनीरसारखा भाग असतो. नास्कवणी करताना हे सगळं मिश्रण पाणी आणि कण दोन्ही वापरलं जातं, कारण त्यातच दुधाची खरी चव असते. त्यामुळे नासलेलं दूध पूर्ण गाळून टाकायचं नसतं, ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ते पाणी वापरा. 

नास्कवणी साधारणपणे गोड प्रकारात केली जाते. एका पातेल्यात नासलेलं दूध घेऊन ते मंद आचेवर गरम करायला ठेवायचं. त्यात चवीनुसार गूळ किंवा साखर घालायची. गूळ घातल्यास नास्कवणीला एक वेगळीच पारंपरिक चव आणि रंग येतो, त्यामुळे अनेक जण गुळालाच प्राधान्य देतात. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण हलक्या हाताने ढवळत राहायचं.

मिश्रण गरम होत असताना त्यात थोडी वेलदोडा पूड घातल्यास छान सुगंध येतो. काही ठिकाणी थोडंसं तूप घालण्याचीही पद्धत आहे, ज्यामुळे नास्कवणी अधिक चविष्ट आणि मऊसर लागते. हे मिश्रण जास्त आटवायचं नसतं, तर थोडंसं रसाळ ठेवायचं. त्यामुळे खायला मऊ आणि हलकं वाटतं. गार करुन खाल्ल तर त्याला जरा घट्टपणाही येतो. गोडाचा पदार्थ म्हणून नास्कवणी अगदी उत्तम आहे. 
 

Web Title : फटे दूध को फेंके नहीं! पारंपरिक नासकवणी बनाएं, गर्मियों का मीठा व्यंजन।

Web Summary : नासकवणी, एक ग्रामीण महाराष्ट्रीयन व्यंजन, फटे दूध को कलाकंद जैसा स्वादिष्ट व्यंजन बनाता है। इसे फटे दूध को चीनी या गुड़ के साथ गर्म करके बनाया जाता है, और स्वाद बढ़ाने के लिए नारियल, चावल या सूखे नारियल को वैकल्पिक रूप से मिलाया जाता है। यह भोजन की बर्बादी से बचने का एक सरल तरीका है।

Web Title : Don't waste spoiled milk! Make traditional Naskavani, a sweet summer treat.

Web Summary : Naskavani, a rural Maharashtrian dish, transforms spoiled milk into a delicious treat similar to Kalakand. It's made by heating the curdled milk with sugar or jaggery, and optionally adding coconut, rice, or dry coconut for enhanced flavor. A simple way to avoid food waste.