Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याच्या मौसमात इटालियन खाऊ, पाहा इटालियन पन्ना कोटाची भन्नाट रेसिपी-मुलं तर म्हणतील रोज रोज हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 17:35 IST

See the amazing recipe for Italian panna cotta recipe - even the kids will say they want it every day : इटालियन पन्ना कोटा रेसिपी.

इटालियन मॅन्गो पन्ना कोटा हा एक क्लासी, थंडगार आणि अतिशय मऊ टेक्स्चर असलेला डेझर्ट आहे, जो मूळ इटलीमधील Panna Cotta या पारंपरिक पदार्थाचा आधुनिक प्रकार मानला जातो. 'पन्ना कोटा' म्हणजे साधारण क्रीम, दूध आणि साखर यापासून तयार होणारा हलका, जेलीसारखा गोड पदार्थ. मूळ पन्ना कोटा साधा, व्हॅनिला किंवा कॅरॅमल फ्लेवरमध्ये बनवला जातो. पण जगभरात त्याचे अनेक फ्लेवर्स लोकप्रिय झाले आहेत आणि त्यात मॅन्गो पन्ना कोटा हा विशेषतः उष्ण देशांमध्ये खूप आवडीने खाल्ला जातो. भारतासारख्या देशात आंब्याची उपलब्धता आणि त्याची गोड चव यामुळे हा प्रकार अधिकच लोकप्रिय ठरला आहे. सर्व्हिंगच्या बाबतीतही हे डेझर्ट खूप आकर्षक असते. वरुन आंब्याचा सॉस, फळांचे तुकडे किंवा पुदिन्याची पाने घालून सजवतात, त्यामुळे तो दिसायलाही खूप एलिगंट वाटतो.

आजकाल हा पदार्थ अनेक हॉटेल्स, कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये 'फ्युजन डेझर्ट' म्हणून दिले जाते. म्हणजे पारंपरिक इटालीयन बेस आणि भारतीय चव यांचं एक सुंदर मिश्रण. विशेष प्रसंगी, पार्टीमध्ये किंवा जेवणानंतर हलकं गोड खायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय मानला जातो. शिवाय करायलाही अगदी सोपा आहे. पाहा मस्त रेसिपी. 

साहित्य१ कप फ्रेश क्रीम, अर्धा कप दूध, अर्धा कप साखर, अगर-अगर, २ टेबलस्पून पाणी, अर्धा कप आंब्याचा रस, चमचाभर व्हॅनिला इसेन्स 

कृती१. सुरुवातीला एका छोट्या भांड्यात अगर - अगर थोड्या पाण्यात घालून ५ मिनिटांसाठी भिजत ठेवायचे. व्यवस्थित भिजल्याशिवाय अगर - अगर छान मुरत नाही. अगदी थोडं पाणी घ्यायचं. 

२. एका पॅनमध्ये कपभर क्रीम, अर्धी वाटी दूध आणि साखर एकत्र करून मंद आचेवर गरम करायचे. हे मिश्रण उकळू देऊ नका, फक्त साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहायचे.

३. आता भिजलेलं अगर - अगर या गरम मिश्रणात घालून नीट ढवळा, जेणेकरुन ते पूर्ण विरघळेल. पूर्ण विरघळल्यावर ते मिश्रण काढून घ्यायचे.

४. गॅस बंद करुन मिश्रण थोडं थंड होऊ द्या आणि मग त्यात व्हॅनिला इसेन्स घाला. व्यवस्थित ढवळून घ्यायचे. हे तयार मिश्रण सर्व्हिंग ग्लास किंवा मोल्डमध्ये ओता आणि किमान ४ ते ५ तासांसाठी फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. सेट झाल्यावर वरून आंब्याचा पल्प घाला. हवं असल्यास थोडे आंब्याचे तुकडेही सजावटीसाठी घालू शकता.

टॅग्स :अन्नइटलीपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशलआंबाकिचन टिप्स