Lokmat Sakhi >Food > सांबार नेहमी फसतो? आमटीसारखाच लागतो? पाहा काय चुकते, करा एकदम परफेक्ट सांबार

सांबार नेहमी फसतो? आमटीसारखाच लागतो? पाहा काय चुकते, करा एकदम परफेक्ट सांबार

See how to make perfect Sambar, South Indian recipe, must try : सांबार करताना लक्षात ठेवा सोप्या गोष्टी. विकतपेक्षा मस्त सांबार घरीच करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 14:25 IST2025-07-01T14:24:37+5:302025-07-01T14:25:36+5:30

See how to make perfect Sambar, South Indian recipe, must try : सांबार करताना लक्षात ठेवा सोप्या गोष्टी. विकतपेक्षा मस्त सांबार घरीच करा.

See how to make perfect Sambar, South Indian recipe, must try | सांबार नेहमी फसतो? आमटीसारखाच लागतो? पाहा काय चुकते, करा एकदम परफेक्ट सांबार

सांबार नेहमी फसतो? आमटीसारखाच लागतो? पाहा काय चुकते, करा एकदम परफेक्ट सांबार

सांबार हा पदार्थ फार साधा आहे. अनेकांना सांबार नीट जमत नाही. कारण ही साधी रेसिपी आपण उगाचच कठीण करुन टाकतो. खरं तर सांबार करायला एकदम सोपा आहे. (See how to make perfect Sambar, South Indian recipe, must try  )सांबार करायची एकदम सोपी रेसिपी जाणून घ्या. आवडत्या भाज्या आणि चांगला सांबार मसाला वापरला की एकदम मस्त सांबार करता येतो. 

साहित्य 
तूरडाळ, हळद, तेल, मोहरी, जिरे, मेथीचे दाणे, काश्मीरी लाल मिरची, हिंग, शेवग्याच्या शेंगा, कडीपत्ता, कांदा, भोपळा, टोमॅटो, बटाटा, वांग, मीठ, सांबार मसाला, चिंच, गूळ, कोथिंबीर

कृती
१. एका कुकरमध्ये दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुतलेली तूर डाळ घ्यायची. तुरडाळीत पाणी घालायचे आणि मग त्यात चमचाभर हळद घालायची. कुकर लावायचा आणि छान मऊ डाळ शिजवायची. डाळ शिजवून झाल्यावर कुकर उघडेपर्यंत भाज्या चिरुन घ्या. 

२.  बटाट्याचे तुकडे करायचे. तसेच वांग्याचेही जाड तुकडे करायचे. कांदा लांब आणि पातळ चिरायचा. तसेच कोथिंबीर छान बारीक चिरायची. भोपळ्याचे जाड तुकडे करायचे. भोपळा घातल्यावर सांबार एकदम छान आणि घट्ट होते. टोमॅटो बारीक चिरायचा. चिंच पाण्यात भिजत घालायची. शेवग्याच्या शेंगांचे काप करायचे. 

३. एका कढईत तेल घ्यायचे. तेलात मोहरी घालायची आणि छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घाला जिरे नाही घातले तरी चालते. काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे घालायचे. त्यात मेथीचे काही तुकडे घालायचे आणि छान परतायचे. तसेच चमचाभर हिंग घाला आणि कडीपत्ता घालून परता. सगळं छान परतून झाल्यावर त्यात कांदा घाला आणि कांदा परतायचा. कांदा खमंग गुलाबी झाल्यावर इतर भाज्या घालायच्या. शेवगा, वांगी, बटाटा, टोमॅटो, भोपळा सारे घाला आणि मस्त परता. 

४. भाज्या नीट परतून झाल्यावर त्यात मीठ घालायचे. तूरडाळ घालायची आणि पाणी घालायचे. त्यात जरा उकळी आली की चिंचेचे पाणी आणि गूळ घालायचा. सांबार मसाला घालायचा. हळद घालायची आणि लाल तिखट घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवायचे. मस्त उकळवायचे. सगळ्या भाज्या शिजल्यावर गॅस बंद करा आणि मस्त गरमागरम सांबार इडली, वडा, भाताशी खा.    

Web Title: See how to make perfect Sambar, South Indian recipe, must try

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.